
''लोकमान्य''ने विश्वासार्हता जोपासली - पंढरी चव्हाण
swt925.jpg
28083
कुडाळः पंढरी चव्हाण यांचा सत्कार करताना ऋषिकेश सामंत, युगा माळगावकर, श्री. धुरी, ग्राहक व कर्मचारी. (छायाचित्रः अजय सावंत)
‘लोकमान्य’ने विश्वासार्हता जोपासली
पंढरी चव्हाणः कुडाळ शाखेच्यावतीने सेवानिवृत्तीपर सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः लोकमान्यने अल्पावधीतच ग्राहकांशी जोपासलेल्या ऋणानुबंधामुळे विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. ग्राहकांना सेवा देताना हित व सेवावृत्तीमुळे आज या बँकेचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत, हे निश्चितच भूषणावह आहे, असे प्रतिपादन एसटी विभागाचे सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक पंढरी चव्हाण यांनी केले
कमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह कुडाळ शाखेच्यावतीने चव्हाण यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा लोकमान्यच्या सभागृहात झाला. यावेळी शाखा व्यवस्थापक ऋषिकेश सामंत, कर्मचारी युगा माळगावकर, समीधा प्रभू, निलेशा कदम, नारायण सामंत, रवींद्र परब, ग्राहक दिनकर धुरी, नारायण कोरगावकर, आशुतोष मुंडले, प्राजक्त चव्हाण, प्रीती परुळेकर, आनंदी सावंत आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘लोकमान्य मल्टिपर्पजच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासले आहे. प्रत्येक ग्राहकाला बँकेच्या माध्यमातून चांगली सेवा मिळावी, यासाठी माणुसकीच्या भावनेतून सेवावृत्ती जोपासली. यामुळेच बँकेचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जिल्ह्यात लोकमान्यचे काम उल्लेखनीय आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणारा अधिकारी व कर्मचारी वर्ग असेल, तर निश्चितच ग्राहक वर्ग याकडे वळतो. ही सेवाभावी वृत्ती या लोकमान्यमध्ये दिसत आहे. भविष्यातही अशीच सेवा देऊन आपला नावलौकिक कायम ठेवावा.’’
लोकमान्यतर्फे दरवर्षी ग्राहकांचे वाढदिवस आपल्या त्या त्या तारखानुसार साजरे केले जातात. आज श्री. चव्हाण यांच्या सत्काराबरोबरच त्यांचा वाढदिवस तसेच प्रीती परुळेकर, आनंदी सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. श्री. चव्हाण यांना शाल, श्रीफळ व रोप देऊन सन्मानित केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66385 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..