
राजापूर-ड्रोन सर्व्हेक्षणविरोधी 24 तास शिवणेत ठिय्या
-rat9p36.jpg
28092
-राजापूर ः आंदोलनस्थळी घोषणाबाजी करताना महिला.
--
-rat9p37.jpg-
L28093
राजापूर ः आंदोलन स्थळी तैनात करण्यात आलेली पोलिस कुमक.
--
-rat9p38.jpg
28094
- राजापूर ः प्रांताधिकारी वैशाली माने आणि सहकारी प्रशासनाशी चर्चा करताना बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे आणि ग्रामस्थ.
--------------
रिफायनरीवरून वादविवाद ..........लोगो
--
ड्रोन सर्व्हेविरोधात शिवणेत २४ तास ठिय्या
प्रचंड पोलिस बंदोबस्त; प्रांताधिकाऱ्यांची आंदोलकांशी चर्चा, विश्वासात घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या जमिनीच्या ड्रोन सर्व्हेक्षणाला गोवळ पाठोपाठ शिवणे येथील ग्रामस्थांनीही तीव्र विरोध केला. त्यासाठी शिवणेवासीयांनी चोवीस तास माळरानावर ठिय्या मांडला होता. प्रांताधिकारी वैशाली माने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासन कोणतेही काम करणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी दिली.
तालुक्यातील धोपेश्वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पातील उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाने केंद्र शासनाला आश्वासित केले आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहारही राज्य शासनाने केंद्र शासनाला केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये ड्रोनद्वारे जमिनीचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाला दोन दिवसांपूर्वी गोवळ येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेत विरोध केला होता. त्यानंतर, शिवणे येथे सर्व्हेक्षण सुरू झाले. ते ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत रोखून धरले.
..
चौकट
आंदोलन दुसऱ्या दिवशीही होते सुरू
रिफायनरीला व त्यामुळे सर्व्हेक्षणाला विरोध असल्याची भूमिका मांडत शिवणेवासीयांनी काल ता. ८ पासून हे सर्व्हेक्षण रोखून धरले होते. या सर्व्हेक्षणासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माळरानावर ग्रामस्थांनी कालपासून ठिय्या मांडला होता. ग्रामस्थांचे हे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. त्याची दखल घेत, गुरुवारी (ता. ९) प्रांताधिकारी श्रीमती माने, तहसीलदार शितल जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्षस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत डीवायएसपी निवास साळोखे, पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर हेही उपस्थित होते.
------------------------------
चौकट
पर्यावरणपूरक प्रकल्पाला पाठिंबा
रिफायनरी आणि केमिकल प्रकल्पाला विरोध असून पर्यावरणपूरक प्रकल्पाला पाठिंबा असल्याची भूमिका ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे मांडली. चर्चा केल्यानंतर यापुढे ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासनाकडून कोणतेही काम केले जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले, म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले, असे बोळे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66393 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..