
बांदा शहरात माकडांचा उच्छाद
swt९२८.jpg
२८१०५
बांदाः कट्टा कॉर्नर येथील सुजाता फोटो स्टुडिओचे माकडाने केलेले नुकसान. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)
बांदा शहरात माकडांचा उच्छाद
स्टुडिओची नासधूस ः सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः बांदा शहरात पुन्हा माकडांनी उच्छाद मांडला आहे. कट्टा कॉर्नर येथील सुजाता फोटो स्टुडिओतील सामानाची माकडाने मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यात स्टुडिओचे मालक अजित दळवी यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुजाता फोटो स्टुडिओत यापूर्वीही माकडाने दोनवेळा सामानाची नासधूस केली होती. आज माकडाने स्टुडिओत प्रवेश करून कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनीटर, फर्निचर, फोटो फ्रेम, ग्लास यांची मोडतोड केली. व्यापारी संतोष चिंदरकर, राकेश गावडे यांनी माकडाला हिसकावून लावले. वनरक्षक डी. बी. शिंदे यांनी नुकसानीची पाहणी केली. माकडाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक एका माकडाने उडी घेत स्टुडिओत प्रवेश केला व आरशासह इतर सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. माकडाला हुसकावून लावीपर्यंत स्टुडिओतील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यात श्री. दळवी यांचे सुमारे ७० हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
बांदा बाजारपेठेत माकडांमुळे नुकसान झाल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. शहरात माकडांचा वाढलेला उपद्रव थांबविणे आवश्यक आहे. वनविभागाने अशा धोकादायक माकडांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी बांदावासीयांमधून होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66395 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..