विधवा प्रथेस सुकळवाडमध्ये तिलांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवा प्रथेस सुकळवाडमध्ये तिलांजली
विधवा प्रथेस सुकळवाडमध्ये तिलांजली

विधवा प्रथेस सुकळवाडमध्ये तिलांजली

sakal_logo
By

सुकळवाडच्या ग्रामसभेत
विधवा प्रथांना तिलांजली

मालवणातील पहिली ग्रामपंचायत

मालवण, ता. ९ ः अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करून सुकळवाड ग्रामपंचायतीने सुद्धा पुरोगामी विचारांच्या शृंखलेत स्थान मिळविले आहे. तालुक्यात सर्वात प्रथम ठराव करून त्याची अंमलबजावणी करणारी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
सुकळवाड ब्राह्मणदेव मंदिर सभागृहात बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच वैभवी मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विधवांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तसेच पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, अलंकार उतरविणे अशा अनिष्ट प्रथा बंद करणे, हळदीकुंकू, धार्मिक कार्यात ओटी भरणे अशा कार्यक्रमात विधवांना मानसन्मान मिळवून देणे, त्यांची हेटाळणी थांबविणे अशा मुद्यांवर चर्चा करून एकमुखाने सर्व ग्रामस्थांनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव पारित केला. सुकळवाड गाव नेहमीच पुरोगामी विचारांचे धोरण राबविणारे गाव आहे. दरम्यान, यावेळी उपसरपंच स्वप्नील गावडे, ग्रामसेवक महेंद्र मगम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुमेधा पाताडे, माजी महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, माजी पंचायत समिती उपसभापती प्रसाद मोरजकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव मसुरकर, माजी उपसरपंच सागर कुशे, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे, वृषाली गरुड, दीपाली गावडे, जयवंती मयेकर, माजी उपसरपंच सुभाष टेंबुलकर, चंद्रसेन पाताडे, सुनील पालकर, किशोर पेडणेकर, रुपेश (नाना) गरुड, भाऊ पाताडे, सुजाता हिंदळेकर, रतन मसुरकर, प्रदीप पाताडे, उमेश पाताडे, शरद पाताडे आदी उपस्थित होते. महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66455 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top