
टुडे पान तीन मेन-''त्या'' कंपनीमागे कोणाचे राजकिय हात?
28212
सतीश सावंत
‘त्या’ कंपनीला टेंडर मिळाले कसे?
सतीश सावंत ः टोल वादावर प्रतिक्रिया,
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १० ः महामार्गावरील टोलचा ठेका मिळवणे ही एक शासकीय प्रक्रिया आहे. जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीने या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला तर त्याचे स्वागतच आहे; पण टेंडर प्रक्रिया हैदराबादच्या कंपनीला मंजूर होत असेल तर त्या कंपनीमागे कोणाचे राजकीय हात आहेत? हे जनता निश्चितपणे शोधून काढेल, असा टोला शिवसेना नेते सतीश सावंत यांनी आज येथे लगावला.
येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. सावंत म्हणाले, ‘‘केंद्रामध्ये नारायण राणे मंत्री आहेत. त्यामुळे टोल माफीसाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये; मात्र राणे कुटुंबांमध्ये मतभेद असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. टोल माफीसाठी शिवसेना सर्वतोपरी आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळावी ही शिवसेनेची भूमिका आहे. टोलमाफीसाठी आम्ही ठेकेदार कंपनीशी नव्हे तर सरकारशी लढणार आहोत. प्रशासनाला जाब विचारणार आहोत. यासाठी शिवसेना लोकशाही मार्गाने आंदोलन करेल. जिल्ह्यातील जनतेच्या रेट्यामुळे टोल माफी होईल. शिवसेना त्या मागे राहिले. या टोलचा सर्वाधिक फटका कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्याला बसणार आहे. याचे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरोस येथे आहे. त्यामुळे नागरिकांना अनेकदा हा टोलनाका ओलांडून जावे लागणार आहे. यासाठी दररोज शेकडो रुपये मोजावे लागतील. त्यामुळे ही टोलमाफी व्हावी, अशी आमची भूमिका आहे; मात्र नारायण राणे म्हणतात, टोलमाफी होणार नाही तर नितेश राणे सांगतात की, टोल माफी होणार. म्हणजे या कुटुंबामध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट आहे. महामार्गावरील टोल वसुलीसाठी प्राधिकरणने टेंडर प्रक्रीया राबवली. यात जर जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती टोल टेंडर घेण्यासाठी प्रयत्नशिल असेल तर स्थानिकांना रोजगार मिळेल; पण हा टोल वसुलीचा ठेका हैद्राबाद येथील एका कंपनीला मिळाला आहे. त्यामुळे येथे परप्रांतीयांना रोजगार मिळणार आहे. ठेका घेतलेल्या त्या हैदराबादच्या कंपनीमागे कोणाचे राजकीय हात आहेत. हे जिल्ह्यातील जनता शोधुन काढेल.’’
----------
चौकट
...मग आम्हाला टोलमाफी का नाही?
सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोल माफी मिळावी म्हणून संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकत्यांनी आंदोलन केले. आमची एकच मागणी आहे. टोल माफी मिळावी. जर कोल्हापूरच्या नागरिकांना टोल माफी मिळत असेल तर सिंधुदुर्गातील जनतेला टोल माफी का नाही? या मागे कोण राजकारण करत आहे. हे लवकरच कळेल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66550 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..