कोकण किनारपट्टीवरील प्रवाळांचा ऱ्हास रोखणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण किनारपट्टीवरील प्रवाळांचा ऱ्हास रोखणार
कोकण किनारपट्टीवरील प्रवाळांचा ऱ्हास रोखणार

कोकण किनारपट्टीवरील प्रवाळांचा ऱ्हास रोखणार

sakal_logo
By

ग्राफीक पद्धतीने लावावे

- rat१०p१५.jpg, rat१०p१६.jpg-
२८२४१
२८२१०, २८२११,
समुद्रात दिसणारी कोरल
---------------
प्रवाळांचा ऱ्हास रोखणार
७२० किलोमीटर किनारपट्टी; राष्ट्रीय समुद्री विद्यान संस्थेची नियुक्ती
राजेश कळंबटे/सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानामुळे भारतीय किनारपट्टीजवळील कोरल रिफ नष्ट होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कांदळवन कक्ष, वनविभाग व राष्ट्रीय समुद्री विद्यान संस्था गोवा यांच्यावतीने प्रवाळ भित्तिकांच्या पुनर्स्थापनेसाठी राज्याच्या ७२० किलोमीटरचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी भारत सरकार, युएनडीपी आणि ग्रीन क्लायमेट फंड यांच्यात किनारी समुदायांची हवामान लवचिकता वाढवणे यांच्यात नुकताच करार झालेला आहे.
कोरल क्षेत्र ओळखणे आणि रेकॉर्ड करणे, तसेच प्रवाळ परिसंस्थेवर ताण आणणारी कारणे अधोरेखित करणे आणि परिसंस्थेवर तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे हा एक वर्षाच्या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. त्यासाठी ६३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील भरती-ओहोटीच्या प्रदेशात प्रवाळ पुन:स्थापनेसाठी योग्य आणि विशिष्ट ठिकाणांचा तसेच संभाव्य अस्तित्वात असलेल्या उच्च दर्जाच्या प्रवाळ क्षेत्रांचा शोध घेण्यात येणार आहे. प्रवाळ हे अपृष्ठवंशीय असून ते स्वत:ला खडकाळ भागात किंवा समुद्राच्या तळाशी जोडलेले असतात. या संशोधनाचा मुख्य उद्देश संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील प्रवाळ खडकांच्या अधिवासाची मुख्य जैविक वैशिष्ट्ये समजून घेणे हा आहे. समुद्र आणि प्रवाळ हे सर्वात मोठे कार्बन सिंक आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रवाह परिसंस्थेवर ताण देणारे घटक माहित झाल्यावर स्थानिक समुदायांशी सल्लामसलत करून महाराष्ट्र किनापरपट्टीवरील प्रस्तावित ३५ हेक्टर क्षेत्रावर प्रवाळ पुन:स्थापनेसाठी काम करण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी सांगितले. यापूर्वी मालवण येथील किनाऱ्यावर प्रवाळांचा शोध घेण्यात आला होता. आता उर्वरित ७२० किमी किनाऱ्यावर हा अभ्यास केला जाणार आहे.
---
चौकट १
प्रवाळ क्षेत्रांना संरक्षण
प्रवाळ भित्तीका ही समुद्राच्या तळावरील लाखो पॉलिप्सने तयार केलेली रचना आहे. ज्यांना त्यांच्या उच्च जैवविविधतेमुळे समुद्राच्या तळाशी असलेले वर्षावन म्हटले जाते. जागतिक तापमानवाढीमुळे सागरी पाण्याचे तापमान वाढत असून त्यामुळे प्रवाळ (कोरल) प्रजाती पांढऱ्या पडत आहेत. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत प्रवाळ क्षेत्रांना वाघ व हत्ती अशा (शेड्युल १) प्रजातीप्रमाणे संरक्षण आहे.
---
चौकट २
रिमोट सेन्सिंग टुलचा वापर
प्रवाळ भित्तीका निर्मितीसाठी योग्य ठिकाणांची जीपीएस कॉर्डिनेट्ससाठी रिमोट सेन्सिंग टुलचा वापर करण्यात येईल तसेच या ठिकाणांचा इतर वनस्पती आणि जीवजंतूंच्या उपस्थितीसाठी तसेच त्यांची सद्यःस्थिती आणि ऱ्हासाची व्याप्ती शोधण्यासाठी रिमेाटली ऑपरेटेड व्हेईकल्स तसेच स्कुबा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल.
---
चौकट ३
केस स्टडी करण्यात येणार
अभ्यासानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर प्रवाळ खडकांचा जीर्णोधार कामांना गती मिळेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील निरोगी सागरी परिसंस्थांचा त्या प्रदेशात राहणाऱ्या समुदायांनाही फायदा होईल. हे सर्वेक्षण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील प्रवाळ खडकांची शाश्वतता सुधारण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक पुरावे प्रदान करेल आणि देशाच्या इतर किनारपट्टीच्या प्रदेशात अशाच प्रकारच्या प्रयत्नांसाठी केस स्टडी करण्यात येणार असल्याचे कांदळवन कक्षाकडून सांगण्यात आले.
------------
चौकट ४
जास्त तापमानामुळे प्रवाळ परिसंस्थेचा ऱ्हास
प्रवाळ हे ऐतिहासिकदृष्ट्या मर्यादित स्वरूपात विखुरले आहे. सामान्यत: हे उष्ण कटिबंधामध्ये जेथे समुद्राचे तापमान १८ ते २४ डिग्री सेल्सिअस आहे अशा ठिकाणी आढळतात; मात्र तज्ञांच्या मते गेल्या १० वर्षात अल् निनो प्रभावामुळे समुद्राचे तापमान २९.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले. तज्ञांच्या मते २९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामध्ये कोरलचे ब्लिचिंग होते व ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे प्रवाळ परिसंस्थेचा ऱ्हास होतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66553 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top