चिपळूण बसस्थानकात उद्या धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण बसस्थानकात उद्या धरणे आंदोलन
चिपळूण बसस्थानकात उद्या धरणे आंदोलन

चिपळूण बसस्थानकात उद्या धरणे आंदोलन

sakal_logo
By

चिपळूण बस स्थानकात
उद्या धरणे आंदोलन
चिपळूण ः चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा बस स्थानकाचे काम रखडले आहे. नागरिकांनी कितीही ओरड केली तरी शासन त्याकडे लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधीही त्यावर आवाज उठवत नाहीत. त्यामुळे या बस स्थानकाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेससह शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने रविवारी (ता. १२) सकाळी ९.३० ते ५.३० दरम्यान येथील बस स्थानकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकार क्षेत्रातील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सोसायटी सदस्य, कमिटी मेंबर, महिला बचत गट, शेतकरी गट, सर्व मंडळे, क्रीडा मंडळे, कर्मचारीवर्ग, व्यापारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी प्रवाशांच्या सोयीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस आाणि शेतकरी-कष्टकरी संघटना यांच्या वतीने केले आहे.
---------
मुरूडला दोन डॉल्फीन
आढळले मृतावस्थेत
दाभोळ ः दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी डॉल्फीन मृतावस्थेत आढळू लागल्याने पर्यावरण तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दापोली तालुक्यातील केळशी, आडे येथे डॉल्फीन मृतावस्थेत आढळून आले असून मुरुड समुद्रकिनारी दोन डॉल्फीन मृतावस्थेत आढळून आले. पर्यटकांना आकर्षण ठरणारे हे डॉल्फीन उष्माघाताचे शिकार ठरल्याची चर्चा सुरू आहे. डॉल्फीन पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून मुरुड किनारी येतात. मात्र दोन डॉल्फीन पाण्याच्या प्रवाहाने किनाऱ्याला आले आहेत, याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या माशांना समुद्रकिनारी पुरण्यात आले. समुद्रात येणाऱ्या विषारी तेलामुळे किंवा अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे हे मासे मृत होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66561 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top