किल्ले रायगडावर आजपासून शिवराज्याभिषेक सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले रायगडावर आजपासून
शिवराज्याभिषेक सोहळा
किल्ले रायगडावर आजपासून शिवराज्याभिषेक सोहळा

किल्ले रायगडावर आजपासून शिवराज्याभिषेक सोहळा

sakal_logo
By

L28240

- सुनील पवार

किल्ले रायगडावर आजपासून
शिवराज्याभिषेक सोहळा
सुनिल पवार ः विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः जेष्ठ शुद्ध द्वादशीपासून म्हणजे उद्यापासून (ता.११) पारंपरिक पद्धतीने वेद मंत्रघोषात शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर साजरा होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे सोहळा आयोजित केल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी दिली.
श्री. पवार म्हणाले, "शिवरायांचा राज्याभिषेक दिन म्हणजे अखंड भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. याचे स्मरण कायम रहावे, म्हणून हा सोहळा त्याच दिवशी त्याच स्थळी म्हणजेच जेष्ठ शुद्ध दुर्गराज रायगडावर शाही इतमामात साजरा केला जातो. दुर्गराज रायगड समितीने गेली २८ वर्ष श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही संस्था महाराष्ट्रातील सुमारे ६० संस्थांना घेऊन समितीचे कार्यकर्ते आणि असंख्य शिवभक्त ऊन्हा-पावसाची पर्वा न करता एकत्र येऊन राज्याभिषेक सोहळा साजरा करतात. साडे तीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी परकीय धर्मांध आक्रमक शत्रूविरुद्ध सशस्त्र उठाव करून जनतेला जागृत करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन रायगडावर स्थापन करून स्वतःचा राज्याभिषेक केला. शालिवाहन शके १५९६ जेष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सर या दिवसापासून राज्याभिषेक शक चालू केला. म्हणून जेष्ठ शुद्ध त्रयोदशी हाच खरा हिंदू साम्राज्य दिन आहे. अखंड भारताच्यादृष्टीने ही अलौकिक घटना होती. छत्रपती शिवरायांनी स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. स्वराज्य रक्षणासाठी गडकिल्ले, पायदळ, घोडदळ आणि आरमार उभारले आणि देदीप्यमान इतिहास घडवला. हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम गेली अनेक वर्ष राज्याभिषेक समिती करत आहे. जात, पात, प्रांत, धर्म यांना एकत्र घेऊन ही समिती कार्यरत आहे."
-----------
कार्यक्रम रुपरेषा ः उद्या (ता.११) सकाळी ८ वाजता श्री गडदेवता शिर्काईपूजन (श्रीशिर्काई मंदिर), सकाळी १० वाजता श्री छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव (राजसदर), सकाळी ११ वाजता श्री व्याडेश्वर पूजन (श्री व्याडेश्वर मंदिर), दुपारी १२ वाजता श्री गणेश पूजन, श्रीजगदीश्वर पूजन (श्री जगदीश्वर प्रसन्न), सायंकाळी ५ वाजता श्री शिवतुलादान विधी (राजसदर), रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (राजसदर). रविवारी (ता.१२) शिवराज्याभिषेक दिन ः पहाटे ५:३० वाजता ध्वजारोहण सोहळा (नगारखाना), पहाटे ६ वाजता श्री शिवप्रतिमा पूजन, अभिषेक व सिंहासनारोहण (राजसदर), सकाळी ८ वाजता श्री पालखी मिरवणूक (होळीचा माळ, श्रीजगदीश्वर प्रसाद), सकाळी १० वाजता महाआरती ( श्री जगदीश्वर प्रसाद), सकाळी ११ वाजता महाप्रसाद व सांगता ( जिल्हा परिषद सभागृह).
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66580 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top