पान दोन मेन-साथरोग टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान दोन मेन-साथरोग टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पान दोन मेन-साथरोग टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

पान दोन मेन-साथरोग टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

sakal_logo
By

साथरोग टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज

महेश खलिपे ः रुग्ण नसला तरी आरोग्य विभाग सतर्क

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः जिल्ह्यात सद्यस्थितित साथीच्या आजाराचा एकही रूग्ण नाही. मात्र, पावसाळा सुरु झाल्याने विविध साथीचे आजार पसरण्याची शक्यता असून जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाय योजना सुरु केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी आज दिली.
जिल्ह्यात दरवर्षी पावसाळी हंगामात लेप्टो या साथीचा प्रादुर्भाव होतो. ही साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये गेल्या तीन वर्षात लेप्टो, हिवताप, डेंग्यू या साथीचे रुग्ण आढळले अशी गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील २११ गावे निश्चित करून या गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जेणेकरून साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिवताप व आरोग्य विभाग एकत्रितरीत्या उपाययोजना राबवित आहे. जिल्ह्यात पावसाळी हंगामात दरवर्षी लेप्टो, हिवताप, डेंग्युचे रुग्ण आढळत असून सलग तीन वर्ष ज्या गावात रुग्ण आढळत आहेत, अशी गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित करून या गावात जनजागृती आणि उपाययोजना यावर भर दिला जात आहे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका याच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन रूग्ण शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार होण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येत आहे.
-----------
कोट
जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला आहे. शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. अशावेळी साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी शेतात काम करणाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आदी लक्षणे जाणवल्यास तत्काळ उपचार करून घ्यावेत.
- डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी
--------------
ग्राफ देतो
जिल्ह्यातील जोखीमग्रस्त गावे (तालुकानिहाय)
वैभववाडी-५
देवगड-११
कणकवली-३४
मालवण-२४
कुडाळ-५२
वेंगुर्ले-१७
सावंतवाडी-२३
दोडामार्ग-४५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66585 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top