कणकवली : अभियांत्रिकी प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : अभियांत्रिकी प्रवेश
कणकवली : अभियांत्रिकी प्रवेश

कणकवली : अभियांत्रिकी प्रवेश

sakal_logo
By

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी सुकळवाड येथे प्रवेश सुरू

कणकवली, ता.१० : सिंधुदुर्ग रेल्‍वे स्थानकालगतच्या सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन मेट्रोपॉलिटन कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथे प्रथम वर्ष पदविका व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी शासन मान्यताप्राप्त सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. दहावीचा निकाल अद्याप लागला नसला तरी इच्छुक विद्यार्थी दहावीच्या परीक्षा क्रमांक टाकून नाव नोंदणी करून प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे जे बारावी (कला, वाणिज्य) शाखेचे पास किंवा नापास विद्यार्थी असतील ते देखील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी पात्र असतील असे कॉलेजच्यावतीने कळविण्यात आले आहे.
दरम्‍यान विद्यार्थ्यांची नावनोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ३० जून पर्यंत मुदत आहे. तर तात्‍पुरती गुणवत्ता यादी ३ जुलै, तक्रारींचे निसरन ४ ते ६ जुलै आणि अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलै रोजी जाहीर होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत १२ वी पास (सायन्स, व्होकेशनल) किंवा दोन वर्षाचा आय.टी.आय पास विद्यार्थी थेट द्वितीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहे. विद्यार्थी प्रवेश अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो या साठी तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ई - स्क्रूटनी व प्रत्यक्ष स्क्रूटनी असे दोन पर्याय आहेत. अधिक माहितीसाठी https://dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य श्री.नवले यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66595 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top