चिपळुणात दहा लाखांचे डांबरीकरण महिनाभरात उखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात दहा लाखांचे डांबरीकरण महिनाभरात उखडले
चिपळुणात दहा लाखांचे डांबरीकरण महिनाभरात उखडले

चिपळुणात दहा लाखांचे डांबरीकरण महिनाभरात उखडले

sakal_logo
By

rat१०p३.jpg ः
२८१८१
चिपळूणः शासकीय गोदामाच्या आवारातील उखडलेले डांबरीकरण.
------------------
चिपळूणात डांबरीकरण महिनाभरात उखडले
शासकीय गोदाम आवारातील प्रकार; माजी नगरसेवकाने केली तक्रार
चिपळूण, ता. १० ः तालुक्याला धान्यपुरवठा करणाऱ्या येथील शासकीय गोदामच्या आवारात सुमारे १० लाख रुपये खर्चातून महिनाभरापूर्वीच डांबरीकरण केले होते; मात्र हे आताच जागोजागी उखडले असून या ठिकाणी मालवाहतूक व अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने पावसाळ्यात आणखी खड्डे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी तक्रार दिली आहे.
शहरातील उक्ताड येथे तालुक्याचे धान्यसाठा व पुरवठ्याचे गोदाम असून, या गोदामात मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा व वाहतूक केली जाते. अनेक वर्षापासून गोदामाचे आवार व परिसरात प्रचंड मोठे खड्डे पडलेले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. आता सुमारे २५ वर्षानंतर या गोदामाच्या आवारात पक्क्या स्वरूपाचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक विभागामार्फत करण्यात आले आहे; परंतु हे डांबरीकरण काही दिवसांतच उखडले आहे. त्याबाबत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. मुकादम यांनी म्हटले आहे की, इतक्या वर्षानंतर प्रथमच या आवाराचे डांबरीकरणाचे काम झाले. त्यामुळे या कामाविषयी फार समाधान वाटले होते; मात्र या डांबरीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता हे काम पूणपणे निष्कृष्ट दर्जाचे व बोगस स्वरूपाचे झालेले आहे. या कामात फसवणूक करण्यात आलेली आहे, हे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसून येत आहे.
या आवारात केलेले डांबरीकरण पूर्ण उखडले गेले असून, ठिकठिकाणी मोठमोठे स्वरूपाचे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणचा भाग पूर्ण खचलेला आहे. या डांबरीकरणाच्या कामात वापरलेले डांबर व खडी तसेच तत्सम साहित्य अत्यंत दर्जाहिन स्वरूपाचे वापरण्यात आले असावे अशी शंका आहे. हे काम अंदाजपत्रकीय आराखड्यानुसार करण्यात आलेले नाही. तसेच लाखो रुपये खर्च करून केलेले काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले. तरी कामाची पडताळणी व सखोल चौकशी करून या कामावर नियंत्रण व देखभाल करणारे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याविरुद्ध योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66601 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top