
हर्षिता ढोकेचा मनसेतर्फे सत्कार
L28258
ओळ - मालवण ः बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या हर्षिता ढोके हिचा मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हर्षिता ढोकेचा
मनसेतर्फे सत्कार
मालवण, ता. १० : बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविलेल्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच दांडी येथील रहिवासी हर्षिता ढोके हिचा तालुका मनसेच्यावतीने तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
बारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेची विद्यार्थिनी हर्षिता पांडुरंग ढोके हिने ८९.३३ टक्के गुण मिळवित तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. तिच्या या यशावद्दल मनसेच्यावतीने आज तिचा निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षिता हिचे आई, वडील अन्य कुटुंबीय, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहराध्यक्षा भारती वाघ, उपशहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, आबा आडकर, राजेश कुडाळकर, मंदार आजगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षिता हिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66608 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..