
रत्नागिरीत पाणी टंचाई टाळण्यासाठी नियोजन
rat१०p२०.jpg
२८२९१
रत्नागिरी - शीळ धरणात पुरेसा पाणी साठा.
-----------
पाणी टंचाई टाळण्यासाठी नियोजन
रत्नागिरी पालिका मुख्याधिकारी बाबर; २५ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा शीळ धरणात
रत्नागिरी, ता. १० : शहराला पाणी टंचाई भासणार नाही, याचे पुर्वनियोजन आम्ही केले आहे. त्याची खबरदारी म्हणून आम्ही दोन आठवड्यापूर्वीच दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. २० ते २५ जूनपर्यंत पाणी पुरेल एवढा साठा शीळ धरणात आहे. त्यामुळे यंदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, त्यात आजपासून पाऊस सुरू झाल्याने पालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावर यंदा प्रचंड ताण आहे. नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू असल्याने पानवल धरणातील पाणी पुरवठा बंद आहे. नैसर्गिक उताराने दोन ते तीन महिने शहराला पुरतो. त्यामुळे शीळ धरणावरील ताण कमी होतो. यंदा सुधारित पाणी योजनेतून नवीन पर्यायी जलवाहिनी टाकल्याने ३० टक्के गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. आता हे प्रमाण नगण्य आहे.
पाणी योजना झाल्यामुळे शहराला यंदा पाणी टंचाई भासणार नाही, अशा वल्गना झाल्या होत्या. त्यात राजापूरची गंगा आल्याने पाऊस १५ जूनपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तविली जात होती. पालिका प्रशासनाने याचा सारासार विचार करून गेल्या दोन आठवड्यापूर्वीच शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. परंतु सुरवातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. कोणत्या भागात कधी आणि किती वेळ पाणी सोडले जाईल याचा अंदाज येत नव्हता. मात्र त्यानंतर पाणी पुरवठा सुरू आहे. दिवसाआड पाणी सोडले जात असले तरी मुबलक सोडले जाते. उष्मा प्रचंड असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही जास्त प्रमाणात होत होते. त्यामुळे पाणी टंचाई भासण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली होती.
याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी बाबर म्हणाले, शहराला जुनच्या अखेरपर्यंत पाणी पुरवठा करता यावा, यासाठी आम्ही आधिच नियोजन केले होते. २० ते २५ जूनपर्यंत पाऊस नाही पडला तरी पाणी पुरेल असे हे नियोजन आहे. त्यामुळे शहरवासीयांना यंदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, याची प्रशासक म्हणून मी खात्री देतो. त्यात आज मान्सूनचे आगमन झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66674 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..