
मंडणगड - सामान्य कार्यकर्त्याचा गौरव म्हणजे राष्ट्रवादी
-rat10p23.jpg
28302
मंडणगड ः राष्ट्रवादी काँग्रेस पाटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सत्कारमूर्तीचा सन्मान करताना राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, संदीप राजपुरे, प्रकाश शिगवण व अन्य.
----------
राष्ट्रवादीत सामान्य कार्यकर्त्याचाही गौरव
मुझफ्फर मुकादम; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी उपक्रम
मंडणगड, ता. ११ ः तेविसाव्या वर्षात पर्दापण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जातीभेदास थारा दिलेला नाही. सर्वधर्म समभावाचे तत्त्वाने पक्षात काम होत असल्याने सामान्य कार्यकर्त्यासही उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पक्षात मानाची पदे हे गौण असून, कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आणखी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम यांनी केला.
शहरातील कुणबी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांसह स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. मुकादम म्हणाले, तालुक्यात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय असून पार्टीने दिलेल्या सर्व कार्यक्रमांची शंभर टक्के अंमलबजावणी केली जात आहे. नजीकच्या काळातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील. या खेपेस पंचायत समितीवर राष्ट्रवादी सभापती पहिल्यांदाच विराजमान होण्याचा विश्वासही व्यक्त केला. या वेळी प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे आदी उपस्थित होते.
..
चौकट
गुणवंत नागरिकांचा सत्कार
कार्यक्रमात तालुक्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व वारकरी, शैक्षणिक क्षेत्रात, कलाक्षेत्रात, वैद्यकीय व पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेले याचबरोबर शेती, राजकारण, समाजकारण आर्थकारण इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तालुक्यातील शंभरहून अधिक गुणवंत नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गौरव करण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66682 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..