जिल्हा बँक व्यवस्थापक सम्राट मुंज यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँक व्यवस्थापक
सम्राट मुंज यांचे निधन
जिल्हा बँक व्यवस्थापक सम्राट मुंज यांचे निधन

जिल्हा बँक व्यवस्थापक सम्राट मुंज यांचे निधन

sakal_logo
By

28328
सम्राट मुंज

अपघातात जखमी झालेल्या
बँक व्यवस्थापकांचा मृत्यू
बांदा, ता. १० ः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मडुरा शाखा व्यवस्थापक सम्राट दिगंबर मुंज (वय ४८, रा. गवळीतिठा, सावंतवाडी) यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. गोवा येथील खासगी रुग्णालयात आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती जाण्याने कर्मचारी वर्गासह नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुंज हे १ जूनला सायंकाळी बँकेचे कामकाज आटोपून घरी जात असताना इन्सुली मेटात ते दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळून अपघात झाला होता. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती उपचारांना हवी तशी साथ देत नव्हती. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सम्राट मुंज हे १५ वर्षांपूर्वी जिल्हा बँकेत रुजू झाले होते. आठ वर्षांपूर्वी त्यांची मळगाव शाखेत शाखा व्यवस्थापक पदावर बढती झाली होती. गेली चार वर्षे ते मडुरा शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. शांत, प्रामाणिक व मृदू स्वभावामुळे त्यांची ग्राहकप्रिय व्यवस्थापक म्हणून ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66722 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top