रत्नागिरी-शिल्लक पट्टा संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-शिल्लक पट्टा संक्षिप्त
रत्नागिरी-शिल्लक पट्टा संक्षिप्त

रत्नागिरी-शिल्लक पट्टा संक्षिप्त

sakal_logo
By

व्हीआरसीसी क्लब विजेता
दाभोळ ः दापोली प्रीमियर लीग २०२२ या स्पर्धेमध्ये देगांवचा व्हीआरसीसी क्रिकेट क्लब विजेता, तर उपविजेता संघ केपी शिवनारी ठरला. (कै.) अनंतजी वाळंज यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या चषकाचा मानकरी कोळबांद्रेतील चिंतामणी संघ ठरला. उत्कृष्ट फलंदाज विनय गोलांबडे, उत्कृष्ट गोलंदाज आकाश मळेकर, सामनावीर प्रतीक भागणे, मालिकावीर अक्षय खळे, उत्कृष्ट कर्णधार पंकज सावरकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमर देवळे, उत्कृष्ट पंच विवेक गोरीवले, तर शिस्तबद्ध संघ म्हणून व्हीआरसीसी देगाव गाव संघाला गौरविण्यात आले.
------------
रस्ता दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा खर्च
दाभोळ ः दापोली पाळंदे, हर्णै, मुर्डी आंजर्लेमार्गे आडे-केळशी रस्ता दुरुस्तीवर ३ वर्षात कोट्यवधींचा चुराडा करण्यात आला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुर्डी येथील विनय जोशी यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुर्डी येथील नागरिक माहिती अधिकार कार्यकर्ते आदित्य पेंडसे यांनी या संदर्भात माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केला आहे; पण तो दहा वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात वारी करत करत अजूनही अनुत्तरित आहे. या अर्जाला उत्तर द्यायच्याऐवजी बांधकाम विभागाने आंजर्ले येथील रस्त्याचे पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू केले आहे. कागदावर दुरुस्त्या दाखवून आजपर्यंत नेमके कुणी आणि किती सरकारी पैसे उडवले? पावसाळा असताना आणि पर्यटन, आंबा व्यवसाय संपलेला असताना आता रस्ते दुरुस्ती करण्यामागे नेमकं कोणतं धोरण आहे? जूनच्या पहिल्या आठवड्यात धूळफेक करण्यासाठी आता नेमके किती रुपये खर्च केले जात आहेत? अजिबात न टिकणारी रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव काय आणि यात खरा लाभार्थी कोण? याची चौकशी करून संबंधितांना तत्काळ निलंबित करत सर्व रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी विनय जोशी यांनी केली.
-------
----------------
दापोलीत शिवस्वराज्याभिषेक दिन
दाभोळ ः दापोली पंचायत समितीत शिवस्वराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विश्वास कदम व सहकाऱ्यांच्या ढोल-ताशाच्या पथकावर पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेझिम-नृत्यकला सादर केली. या वेळी कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. त्यानंतर गटविकास अधिकारी दिघे यांच्या हस्ते स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शाहीर शंकर भारदे, महेंद्र कदम, प्रकाश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक संभाजी सावंत, राजेश कदम, दर्शना कदम आदींनी शिवचरित्रावर आधारित गीत सादर केले.
--------------------
-rat11p14.jpg
28411
खेड ः प्लास्टिक पिशव्या बंदी रॅलीत सहभागी लायन्स या संस्थेचे पदाधिकारी.
-----------
प्लास्टिक पिशव्या बंदी जनजागृती रॅली
खेड ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खेड पालिका व लायन्स क्लब ऑफ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक पिशवी बंदीबाबत रॅली काढण्यात आली. या वेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले. यात मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगांवकर, जेसीजचे अध्यक्ष अमोल दळवी, प्रथमेश खामकर, रविउदय जाधव, लायन्स क्लबचे रोहन विचारे, सुरेश चिकणे, सुजित दरेकर, प्रवीण पवार, नीलेश सकपाळ, अरुण जाधव, मनोज म्हातले, सुजित जाधव, अरविंद सांवत, उत्तम कांबळे सहभागी झाले होते.
---------
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याबाबत
पावस ः दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सहसचिव भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सन २०२२ च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. १ जून २०२२ पासून https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरू झालेली आहे. इच्छुक शिक्षकांनी २० जून २०२२ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
------ ----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66833 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top