
रत्नागिरी-सदर
१०२ वर सदर ५ ता. लागले आहे
...
संस्कृती ............लोगो
.....
rat11p10.jpg
28394
ः अंजली बर्वे
---------
इंट्रो
संस्कृतीविषयक सदर सकाळमध्ये सुरू झाल्यावर छान प्रतिसाद मिळू लागला. विशेष म्हणजे माझ्या आणि वाचकांच्या मनातही वाचन, मनन, चिंतन ही आवश्यक प्रक्रिया घडू लागली. संस्कृती म्हणजे काय? पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरा, चालीरिती म्हणजे संस्कृती का? त्यात काळानुसार बदल व्हायला हवेत ना? चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा बंद झाल्याच पाहिजेत ना? संस्कृतीच्या नावामागे विकृती दिसू लागते, तेव्हा ती मिरवावी की त्याज्य मानावी ? असे अनेक प्रश्न मनात पिंगा घालतात. खरंतर, संस्कृती म्हणजे सांस्कृतिक इतिहासच आहे. इतिहासात घडलेल्या घटना, त्याची कारणे, परिणाम अभ्यासून त्यांची नोंद घेऊन आपण चांगले-वाईट, चूक, बरोबर ठरवत वर्तमानात जगायचे असते. त्या काळात, त्या परिस्थितीत एखादा निर्णय, कृती योग्यही असेल; पण कालांतराने ती योग्य ठरेलच असे नाही.
-अंजली बर्वे, रत्नागिरी
-------------------------------------
इतिहासाचा धांडोळा घेत वर्तमानात जगायचे
अंधश्रद्धेचे मानसशास्त्र समजण्यासाठी एका प्रयोगाची कथा पुरेशी आहे. एका बंदिस्त खोलीत दोन माकडांना ठेवले, वर केळीचा घड ठेवला आणि तिथे जाण्यासाठी शिडी ठेवण्यात आली. अर्थातच, केळी बघून माकडे शिडी चढू लागली. माकडे शिडीवर चढताच त्यांच्यावर उकळलेले पाणी पडेल, अशी व्यवस्था होती. अचानक भाजायला होत असल्याने माकडे वर न चढता खाली पळू लागली. असे प्रत्येक प्रयत्नाला होत होते. नंतर आणि काही माकडांना (दुसरा गट) त्या खोलीत सोडले. ती नवी माकडे शिडी चढू लागताच पहिली माकडे त्यांना खाली खेचत असत. कारण, त्यांनी उकळत्या पाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्याने तो त्रास नव्या माकडांना होऊ नये, ही भावना! नंतर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या माकडांना बाहेर काढले गेले. उकळते पाणी पडणे पण बंद केले गेले आणि नवी दोन माकडे (तिसरा गट) आत सोडली. ती नवी माकडे शिडीवर चढू लागली. त्यांना दुसऱ्या गटाने खाली खेचले. वास्तविक, आता उकळते पाणी पडणार नव्हते आणि दुसऱ्या गटाने प्रत्यक्ष अनुभवही घेतला नव्हताच; पण शिडी चढू नये, हे त्यांना पाहिल्या गटाने मनात बिंबवले होते. गोष्ट संपली. आता हरीदासाची कथा मूळ पदावर!
सांगायचा मुद्दा असा की, अंधश्रद्धा अशी दृढ होते. आता येणाऱ्या वटपौर्णिमेचा हाच प्रकार आपण पाहतो. बाजारात वडाच्या फांद्या मिळतात. त्या आणल्या जातात. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या झाडापासून दूर, चार भिंतींच्या आत वड पूजला जातो. अगदी छोट्या प्रतिकात सौभाग्य अलंकार ठेवले जातात. त्यांचा कुणालाच उपयोग नसतो. घराघरांत वडाच्या फांद्या पूजल्या जातात. अर्थात, त्या कल्पनेतून, जाणिवेतून नाते दृढ व्हायला मदत होते, भावबंध टिकून राहतात. सावित्रीच्या कथानकातून तिचा त्याग, बुद्धी, प्रयत्नशीलता, सासू साऱ्यांबद्दलच्या शुभ भावना, या सगळ्या आदर्शवत चरित्राचे मनन होते. या झाल्या सगळ्या जमेच्या बाजू! आणि म्हणूनच एखादी प्रथा आधुनिकतेच्या नावाखाली बंद पाडण्यापेक्षा त्यातील उणीवा दूर करून ती चालू ठेवली, चांगले बदल केले तर जुनी, मलीन वस्त्रे टाकून नवी भरजरी वस्त्रे, आभूषणे घालून, नटूनथटून संस्कृती आपल्यासमोर आकर्षक रूपात येईल.
आज विज्ञानाद्वारे प्रयोगांनी हे सिद्ध होत आहे की, आपले सणवार, परंपरा साजरे करताना आहार-विहार, शास्त्राचा विचार केला गेला आहे आणि श्रद्धेला त्याच्याशी जोडले असल्याने भक्तीयुक्त अंतःकरणाने सामान्य लोक अनुकरण करतात, हेही महत्वाचे; पण आज उलट स्थिती दिसते. पुरेशी माहिती न घेता परंपरा नाकारत स्वतःला आधुनिक समजणाऱ्ंयाची संख्या वाढते आहे. असो! ज्यांना हे व्रत करायचे आहे, त्यांनी वटसावित्रीचे पूजन करताना हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहे.
वट मुले स्थितो ब्रह्मा
वटमध्ये जनार्दनः
वटाग्रे तू शिसोदे
सावित्री वटसंश्रिता||
-----------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66877 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..