
वेंगुर्लेत संततधार सुरूच
28448
वेंगुर्ले ः घरावर झाड पडून झालेले नुकसान.
वेंगुर्लेत संततधार सुरूच;
२४ तासांत ९२.२ मि.मी.
वेंगुर्ले ः मॉन्सूनने वेंगुर्ले तालुक्यातही जोरदार हजेरी लावली असून, शुक्रवारपासून शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पावसात तालुक्यात काही प्रमाणात झाडांची पडझड होऊन नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात केली आहे. शुक्रवारपासून मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी व पेरणीसाठी सध्या मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने बळिराजा सुखावला आहे. शुक्रवारी वेंगुर्ले किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले होते. यामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दाभोसवाडा येथील सुरेश बटवलकर व येथीलच सीप्रियन फर्नांडिस यांच्या घरावर शेजारील भेंडीचे झाड पडून छपराचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या २४ तासांत तालुक्यात ९२.२ मिमी, तर एकूण १११ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66884 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..