दाभोळ ः बेकरी उत्पादने आजपासून महागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः बेकरी उत्पादने आजपासून महागणार
दाभोळ ः बेकरी उत्पादने आजपासून महागणार

दाभोळ ः बेकरी उत्पादने आजपासून महागणार

sakal_logo
By

-rat11p24.jpg
28488
दाभोळ ः पत्रकार परिषदेत माहिती देताना बेकरी संघटनेचे पदाधिकारी.
----------------
बेकरी उत्पादने आजपासून महागणार

बेकरी संघटनेची माहिती; ब्रेड, खारी, टोस्टच्या किंमतीत वाढ
दाभोळ, ता. ११ ः मैदा, वनस्पती तूप व तेल यांच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे दापोली तालुका बेकरी असोसिएशनच्यावतीने १२ जूनपासून सर्व बेकरी उत्पादनात ३० ते ५० टक्के वाढ करत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
दापोली तालुका बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष इम्रान खान यांनी सांगितले, ५० किलो मैद्याचे पोते पूर्वी १ हजार १०० रुपयांना मिळत होते, ते आता १ हजार ६०० रुपये झाले आहे. १५ किलोचा वनस्पती तुपाचा डबा १ हजार २०० रुपयांवरून २ हजार ८०० रुपयांवर गेला आहे. तसेच १५ किलो तेल डबा १ हजार २०० रुपयांना मिळत होता तो आता २ हजार ८०० रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे सिलेंडर, वीजबिल यामध्ये देखील भरमसाठ वाढ झाली आहे. नोकरांचा पगार, इतर मेंटेनन्स आणि खर्च यांचा ताळमेळ राखणेदेखील कठीण बनलेले आहे. यामुळे नाइलाजास्तव दापोली तालुका बेकरी असोसिएशन आपल्या उत्पादनाच्या किंमतीमध्ये वाढ करत आहे.
१२ जूनपासून पावाची लादी ५० रुपयाला मिळणार आहे. ती आधी ३५ रुपयांना मिळत होती. १० रुपयाला मिळणारे पावाचे पाकीट आता १५ रुपयाला मिळणार आहे. १० रुपयाला मिळणारा बनपाव आता १५ रुपये किमतीने विकला जाईल. त्याचप्रमाणे बटर, टोस्ट, खारी यांचे २० रुपयाला मिळणारे पाकीट आता २५ रुपयाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा ब्रेड जो २५ रुपये किमतीत मिळत होता, तो आता ३० रुपयाला मिळणार आहे, असे अध्यक्ष इम्रान खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. पत्रकार परिषदेला एम. रामचंद्रन्, अन्वर मेमन, आरिफ तांबे, मजीद घीवाले, विनायक पोवार, अझर खालीद, अब्दुल महमूद, सूरज, अब्दुल हक आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------
ग्राफ करावा
चौकट
दरावर एक नजर..
बनपाव आताः १५ रूपये
बटर, टोस्ट, खारी पाकिटः २५ रूपये
ब्रेडः ३० रूपये
पावाची लादीः ५० रुपये

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66951 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top