पर्यावरण दिनानिमित्त नाधवडेत वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण दिनानिमित्त नाधवडेत वृक्षारोपण
पर्यावरण दिनानिमित्त नाधवडेत वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त नाधवडेत वृक्षारोपण

sakal_logo
By

पर्यावरण दिनानिमित्त नाधवडेत वृक्षारोपण
वैभववाडी, ता. ११ ः कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या बीएससी डिग्रीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी ''रावे'' (ग्रामीण कृषी कार्यानुभव) उपक्रमांतर्गत रविवारी नाधवडे येथे वृक्षारोपण केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाधवडे सरपंच आदिती नारकर होत्या. उपसरपंच सूर्यकांत कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय तावडे, जिल्हा परिषद माजी सदस्य सुधीर नकाशे व ज्येष्ठ नागरिक महादेव कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य लीना ताई पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीरंग पावसकर, माजी उपसभापती बंडू मांजरेकर व इतर मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. सुधीर नकाशे व प्रमुख पाहुण्यांनी शेतकरी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय सांगूळवाडी येथील विद्यार्थी ओंकार निकम, शुभम काळोखे, अक्षय डुकरे, सुहास पवार, अक्षय थोरात, मयुरेश सानप, शुभम गायकवाड, तेजस जाधव व रोहित पैलवान यांनी केले.
--
सावंतवाडीत वृक्षारोपण
सावंतवाडी ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून सावंतवाडी सेंट्रल इंग्लिश स्कूल शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष सौ. रेवती राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग-व्यापार हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, मुख्याध्यापिका सौ. निर्मला हेशागोळ, माजी नगरसेविका व सावंतवाडी मर्कजी जमात ट्रस्टच्या उपाध्यक्ष नीलोफर बेग व शिक्षक उपस्थित होते.
-------------
परुळे सोसायटी चेअरमनपदी सामंत
वेंगुर्ले ः तालुक्यातील श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटी परुळेच्या चेअरमनपदी नीलेश सामंत यांची, तर व्हाईस चेअरमनपदी प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड झाली. पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात भाजपा प्रणित सहकार गाव विकास पॅनेलने १३-० असा निर्विवाद विजय मिळविला आहे.
--------------
मालवण बीडीओंचा सत्कार
मालवण ः तालुका सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी संघटना यांच्या वतीने मालवण तालुका गटविकास अधिकारी म्हणून नव्याने हजर झालेले श्री. गुजर यांची भेट घेऊन तालुका अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मालवण तालुका सेवानिवृत्त ग्रामसेवक संघटनेचे सचिव अशोक ओटवणेकर, कृषी अधिकारी श्री. गोसावी, विस्तार अधिकारी के. टी. पाताडे उपस्थित होते. अध्यक्ष एच. बी. प्रभू व सचिव ओटवणेकर यांनी मालवण तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती, विभागवार गाव संरचना व विकास परिस्थिती याबाबत गटविकास अधिकार्‍यांना माहिती दिली. आभार श्री. ओटवणेकर यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67013 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top