
जिल्ह्यात कोरोनाचे ४ नवे रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचे ४ नवे रुग्ण
ओरोस, ता. ११ ः जिल्ह्यात आज कोरोनाचे ४ नवीन रुग्ण मिळाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या २४ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७ हजार ४३१ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील ५५ हजार ८७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १५३३ रुग्णांचे निधन झाले आहे. २४ रुग्ण उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज मिळालेले रुग्ण (कंसात एकूण रुग्ण)ः देवगड १ (६९४७), दोडामार्ग २ (३२३४), कणकवली १ (१०६१६), कुडाळ १ (११८७०), मालवण ० (८२५५), सावंतवाडी ० (८५१४), वैभववाडी ० (२५६३), वेंगुर्ले १ (५१११), जिल्ह्याबाहेरील ० (३२१). तालुका निहाय सक्रीय रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) देवगड २ (१८५), दोडामार्ग ११ (४७), कणकवली २ (३२१), कुडाळ ३ (२५४), मालवण १ (३०१), सावंतवाडी १ (२१७), वैभववाडी १ (८३), वेंगुर्ले १ (११६) जिल्ह्याबाहेरील रुग्ण २ (९).
२४ रुग्ण सक्रिय आहेत. यातील एकही रुग्ण गंभीर आजारी नाही. आर.टी.पी.सी.आर. टेस्टमध्ये ३ लाख ४० हजार ५०४ नमुने तपासण्यात आले. यातील ४१ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने १०५ नमुने घेण्यात आले. ॲन्टिजन टेस्टमध्ये एकूण २ लाख ९६ हजार ७१८ नमुने तपासले. पैकी १६ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन ८२ नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण ६ लाख ३७ हजार २२२ नमुने तपासण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67039 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..