
स्पर्धा परीक्षेचा पाया ज्ञानदीपने रचला - महाडिक
rat१२p१०.jpg ः
२८६४०
खेडः ज्ञानदीप संस्थेमार्फत युपीएसस्सी उत्तीर्ण झालेल्या अक्षय महाडिक याचा सत्कार करण्यात आला.
-----------
स्पर्धा परीक्षेचा पाया ज्ञानदीपने रचला
अक्षय महाडीक; खेडमध्ये सत्कार सोहळा उत्साहात
खेड, ता. १२ ः माझ्या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेचा पाया ''ज्ञानदीप'' ने घातला. युपीएसस्सी परीक्षेत मी जे यश मिळवले त्यामध्ये माझे आई-वडील, सर्व शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे, असे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २१२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अक्षय महाडीकने सांगितले.
ज्ञानदीप विद्या संकुलाचा माजी विद्यार्थी अक्षय महाडीक याचा सत्कार ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळातर्फे करण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेत (भा. प्र. से.) वर्ग-१ चा अधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे. त्यानिमित्त ज्ञानदीप संस्थेतर्फे संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, सेक्रेटरी प्रकाश गुजराथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते. ही परीक्षा कठीण असली तरी मेहनतीने, जिद्दीने आपण त्यामध्ये यश मिळवू शकतो, दररोज वर्तमानपत्रांचे वाचन करणे, संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे, कादंबर्यांचे वाचन करणे आवश्यक आहे, असे अक्षयने सांगितले.
या वेळी सरचिटणीस प्रकाश गुजराथी म्हणाले, अक्षय महाडीकने युपीएससीमध्ये मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. अरविंद तोडकरी म्हणाले, अक्षय महाडीक याच्या रूपाने एक सनदी अधिकारी देशाला मिळाला याचा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून युपीएसस्सी परीक्षेचा विचार केला पाहिजे. आज देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर चांगल्या प्रशासकीय अधिकार्यांची गरज आहे. कार्यक्रमाला उपाध्यक्ष माधव पेठे, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाचे चेअरमन दीपक लढ्ढा आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67165 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..