म्हाप्रळ- चिंचाळीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चिखलमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाप्रळ- चिंचाळीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चिखलमय
म्हाप्रळ- चिंचाळीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चिखलमय

म्हाप्रळ- चिंचाळीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चिखलमय

sakal_logo
By

(,ग्राफीक पद्धतीने लावावे)
( हाफपेजच्या खालपर्यंत लागले तरी चालेल
...
सकाळ विशेष..........लोगो
....
फोटो ओळी
-rat12p14.jpg
28656
-चिंचाळी : महामार्गावर पडलेले खड्डे
....
-rat12p15.jpg
28657
-पन्हळी : पन्हळी तिढ्यावरील दयनीय अवस्था.
....
-rat12p16.jpg
28651
-म्हाप्रळ : जीवावर बेतणारा खड्डे, चिखलमय प्रवास.
....
-rat12p१७ jpg
L28652
-डायव्हर्शन दाखविणारे अजब प्रकार.
------------------
महामार्ग चिखलात, ४० लाखांचा खर्च पाण्यात!

पहिल्याच पावसात म्हाप्रळ-चिंचाळीपर्यंतच्या रस्त्याचे तीन तेरा; चार कि.मी. अंतरात चिखलमय पट्टा

सचिन माळी ःसकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ ःमंडणगडचे प्रवेशद्वार असणाऱ्या म्हाप्रळपासून चिंचाळीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चिखलमय झाला आहे. चार वर्षापासून प्रस्तावित असलेला व विविध कारणांनी रखडलेल्या आंबडवे-लोणंद या तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे मोसमी पावसाच्या आगमनालाच तीन तेरा वाजलेले दिसून आले. चार कि.मी. अंतरात चिखलाचा मोठा पट्टा निर्माण झाला असून राष्ट्रीय प्राधिकरणाच्या कृपेने प्रवासी, पर्यटकांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे. पहिल्याच दिवशी सहा वाहने घसरून अपघात घडले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या मंजूर कामासाठी जुन्या ठेकेदाराचे काम काढून घेऊन या कामावर नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला. रस्ता दुरुस्तीसाठी आमदार योगेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करुन या प्रश्नाकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय अनेक नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या आहेत. ६ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनीही मे महिन्यापूर्वी रस्ता सुरळीत करण्याचे आदेश प्राधिकरणास दिले होते. स्थानिक तहसीलदार या कामी गेले तीन महिने सातत्याने पाठपुरावा करीत होते.
गेल्या वर्षी पावसाच्या तोंडावर चाळीस लांखांचा निधी खर्च करून पूर्णपणे नादुरुस्त भागाचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, साईडपट्टी व गटारे नसल्याने हे काम पावसाला सुरवात झाली अन् आठ दिवसांतच पूर्णपणे बाद झाले. रस्त्यावरील खडी डांबरसह वाहून गेली. पूर्ण पावसात चिखलमय रस्त्यावरुन वाहतूक करावी लागली. यंदा तर याच नादुरुस्त अंतरात नवीन ठेकेदाराने हंगाम संपल्यावर काँक्रीट रस्त्याचा घाट घातला. पहिल्या पावसानेच प्राधिकरणाच्या सर्व मनसुब्यावर पाणी फेरले. जुन्या ठेकेदाराने तीन वर्षापूर्वी बांधलेला काँक्रीट रस्ताही एका वर्षाचा पाऊस झेलू शकलेला नाही, हा इतिहास लक्षात घेता प्राधिकरणाने काळजी घेणे आवश्यक होते.
----------------------------------
चौकट
नेमके झालेय काय
* आवश्यक सोपस्कर पूर्ण झाले नाहीत
* जुन्या ठेकेदाराने सुस्थितील रस्ता खोदला
* खोदतानाचा उत्साह नंतर बारगळला
* केवळ कागदावर दर्जा बदलून फसगत
* तालुकावासीय कायमस्वरुपी समस्याग्रस्त
---------------------------------
चौकट
या समस्या आजही कायम..
मंडणगड ते म्हाप्रळ सारे खड्डे तसेच
अठरा कि.मी. साठी लागतो एक तास
वाहनांचे दोन वर्षांपासून मोठे नुकसान
-------------
चौकट
धड रस्त्याविना पुलापर्यंत जाणार कसे?
राष्ट्रीय महामार्ग हा केंद्राच्या अखत्यारितील विषय असल्याने विद्यमान खासदारांनी या विषयात लक्ष घालणे अपेक्षित होते. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील म्हाप्रळ-आंबेत पुलाचे सदृढीकरणाच्या कामात त्यांनी जातीने लक्ष घातले. वाहतुकीला जेटीचा पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र, रस्ताच धड नसेल तर पुलापर्यंत वाहने पोहचणार कशी? कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या विनीयोगाचा उपयोग काय? असा प्रश्न तालुकावासीय उपस्थित करू लागले आहेत.
---------------------------------
कोट
रोज मरे त्याला कोण रडे, असा प्रकार या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात सुरू आहे. प्राधिकरणाचे कार्यालय ४० कि.मी. लांब आहे. जवळ असते तर रोजच कार्यालयावर सामाजिक, राजकीय व तालुकावसीय धडकले असते. तालुक्याची बोळवण करण्याचा प्रकार सुरू आहे.
- रघुनाथ पोस्टुरे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67174 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top