लांजा-बालिकेची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-बालिकेची गळफास घेऊन आत्महत्या
लांजा-बालिकेची गळफास घेऊन आत्महत्या

लांजा-बालिकेची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By

सात वर्षांच्या बालिकेची
गळफास लागून आत्महत्या

कोर्ले सरकारवाडी येथील घटना; लांजा तालुका हादरला

लांजा, ता. १२ ः सात वर्षांच्या मुलीने घराच्या भिंतीला असलेल्‍या खिळ्याला गळफास लागून आत्महत्या केली. ही घटना कोर्ले सरकारवाडी येथे शनिवारी (ता. ११) रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आर्या राजेश चव्हाण असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
कोर्ले सरकारवाडी येथे आर्या ही आपल्या वडिलांसोबत राहते. तिची आणखी एक बहीण अंदाजे दहा वर्षांची आहे. शनिवारी रात्री या दोघी बहिणी घरात खेळत होत्या. वडील राजेश सुभाष चव्हाण (वय ३८) हे कोर्लेफाटा येथे गेले होते. काही वेळाने खेळता खेळता आर्या हिची मोठी बहीण ही आजीसोबत भांडी घासायला गेली होती. थोड्यावेळाने घरात खेळणाऱ्या आर्याचा आवाज ऐकू येत नसल्याने आर्याची बहीण आणि आजीने पाहिले असता आर्या ही गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी गोळा झाले. याची माहिती वडील राजेश यांना देण्यात आली. त्यानंतर तिला प्रथम कोर्ले येथील खासगी डॉक्टर व नंतर लांजा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी आर्या हिला मृत घोषित केले. या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील या करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67269 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top