
पौगंडावस्थेतील मुलांसाठी पुढाकार घ्या
28729
सावंतवाडी ः शिबिरात जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे, अॅड. संग्राम देसाई, अॅड. पी. डी. देसाई, दिवाणी न्यायाधीश श्रीमती बेडगकर आदी. (छायाचित्र ः रोहन गावडे)
पौगंडावस्थेतील मुलांसाठी पुढाकार घ्या
एस. व्ही. हांडे ः सावंतवाडीत कार्यशाळेला प्रतिसाद
सावंतवाडी, ता. १२ ः विकसित तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत आहेत. या तंत्रज्ञानाचा दुरुपयोगही केला जात आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखीच वाढली आहे. गुरू-शिष्याचे नाते वृद्धिंगत झाले, तरच पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिक आरोग्यावर योग्य मार्गदर्शन होऊ शकते. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण, सावंतवाडी तालुका वकील संघटना, जिल्हा रुग्णालय, रोटरी क्लब सावंतवाडी आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘पौगंडावस्थेतील मुलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. हांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅंड गोवाचे उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर, वकील संघटना अध्यक्ष पी. डी. देसाई, रोटरी क्लबचे सुधीर नाईक, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती डी. बी. सुतार, जिल्हा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए. व्ही. कुरणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटकर उपस्थित होते.
यावेळी अॅड. संग्राम देसाई, अॅड. पी. डी. देसाई यांनी विचार मांडले. जिल्हा रुग्णालयाच्या चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ डॉ. रेश्मा भाईप यांनी ‘पौगंडावस्थेतील मुले व त्यांच्यात होणारे बदल’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय प्रा. न्यायवैद्यक विषविज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच वेंगुर्ले हॉस्पिटलच्या संहिता विभागाच्या डॉ. मुग्धा ठाकरे, महाराष्ट्र बाल हक्क आयोगाचे सदस्य विकास सावंत यांनी मार्गदर्शन केले. दिवाणी न्यायाधीश श्रीमती बेडगकर यांनी स्वागत केले. यशवंतराव भोसले नॉलेज सिटी शैक्षणिक संस्थेने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67299 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..