३ वा ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३ वा ४
३ वा ४

३ वा ४

sakal_logo
By

फोटो येत आहे
...
-rat12p30.jpg- अपघातग्रस्त रिक्षा.
-------------
एसटीची रिक्षाला धडक, तिघे जखमी
खेड ः खेड-दापोली मार्गावरील साखरोलीनजीक एसटीने रिक्षाला दिलेल्या धडकेत तिघेजण जखमी झाले. या प्रकरणी बसचालक संजय अर्जून कुंभारकर (वय ४६, रा. मिरज-सांगली) यांच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक वसंत नारायण चंदे यांच्यासह फरजाना देसाई (४९), शबाना अल्ताफ बिजले (४०, दोघीही, रा. खेड) अशी जखमींची नावे आहेत. रिक्षाचलाक वसंत चंदे हे रिक्षा (एमएच-०८-ई-७७८७) घेऊन खेड येथून साखरोलीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्‍या एसटीने धडक दिली. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
---------
त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात अपयश
खेड ः तालुक्यातील लोटे हद्दीतील धामणदेवीनजीक संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला. सांगड्यांचे अवयव मिरज येथे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्तीनंतरच नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. या मृतदेहाच्या अंगावर लाल -हिरव्या रंगाच्या उभ्या रेषा असलेला शर्ट, काळ्या रंगाचा हाफ बरमोडा, गळ्यात पांढऱ्‍या रंगाची माळा व पंचरंगी धागा असलेला ताईत आहे. या वर्णनाच्या व्यक्तीची कोणाला माहिती असल्यास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे (८२७५२७५२४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी केले आहे.
-------------
-rat12p31.jpg
28712
- संगमेश्वर ः दगडावर धडकलेला ट्रक.
---------------
ट्रकला अपघात, चालक बचावला
संगमेश्वर ः मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ओझरखोल येथे सकाळी ट्रकला अपघात झाला. रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात असताना ट्रक चालकाला झोप अनावर झाल्याने ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन कातळामध्ये धडकला. अपघात होताना ट्रक चालकाने क्लिनरच्या बाजूच्या सीटवर उडी घेतल्याने सुदैवाने बचावला. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू होती.

---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67301 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top