
राजापूर ःराजापूर पालिकेत 10 महिला येणार निवडून
-rat13p15.jpg
28812
ः राजापूर नगरपालिका
------------
राजापूर पालिकेत १० महिला येणार निवडून
आरक्षण सोडत जाहीर; प्र. ५ अनु. जाती महिलांसाठी राखीव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः राजापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १३) आरक्षण सोडत काढण्यात आली. वीस नगरसेवकांपैकी १० जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्यामध्ये एक जागा अनुसूचित जातीसाठी तर उर्वरित नऊ जागा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. प्रभाग- ५ मध्ये अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या जास्त असल्याने येथील एक जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव केली आहे.
नगर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पवार, माजी नगरसेवक हनिफ काझी, गोविंद चव्हाण, अनिल कुडाळी, शीतल पटेल, माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे, मनसेचे आजिम जैतापकर आदी उपस्थित होते.
-----------
चौकट
ओबीसींना सर्वसाधारणमधून लढवावी लागणार..
ओबीसी आरक्षणामुळे यापूर्वी नगरपालिकेमध्ये ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून काही उमेदवार नगर पालिकेमध्ये निवडून येत होते; मात्र ओबीसी आरक्षणाचा घोळ अद्यापही सुटला नसल्याने या वेळच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत. त्यामुळे सोडतीमध्ये ओबीसींसाठी एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना या वेळी सर्वसाधारण जागांवरून निवडणूक लढवावी लागणार आहे.
---------
चौकट
महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल..
नव्या प्रभागरचनेमुळे नगरसेवकांची संख्या वाढली असली तरी, एकाचवेळी दहा महिला निवडून जाणार आहेत. पालिकेतील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव झाल्याने दांडगा जनसंपर्क आणि निवडून येण्यास सक्षम असलेल्या महिला उमेदवारांचा शोध घेण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर राहणार आहे.
...
चौकट
नगरपालिकेचे आरक्षण
प्रभाग-१*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-२*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-३*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-४*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-५*अ) अनुसूचित जाती महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-६*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-७*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-८*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
प्रभाग-९*अ) सर्वसाधारण महिला* ब) सर्वसाधारण
प्रभाग-१०*अ) सर्वसाधारण महिला*ब) सर्वसाधारण
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67417 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..