चिपळूण - महापुराचा इशारा मिळताच यंत्रणा कार्यान्वीत होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - महापुराचा इशारा मिळताच यंत्रणा कार्यान्वीत होणार
चिपळूण - महापुराचा इशारा मिळताच यंत्रणा कार्यान्वीत होणार

चिपळूण - महापुराचा इशारा मिळताच यंत्रणा कार्यान्वीत होणार

sakal_logo
By

हाफ पेजपर्यंत लावावे
...
-rat13p10.jpg
L28807
ः प्रसाद शिंगटे
..
-rat13p11.jpg
28808
ः चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीत बोट चालविण्याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्यात आले.
..
-rat13p12.jpg
28842
ः घरातून गोळा होणारा कचरा गटारात न टाकता जमा करून पालिकेच्या कचरा गाडीत देण्याबाबत जनजागृती सुरू आहे.
---------------
महापुराला सामोरे जाताना---लोगो
..
इंट्रो
वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्यात आला असला तरी यावर्षी शहरात महापूर येणार नाही, याची शाश्वती देण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या महापुरातून धडा घेत पालिका, महसूल व शासनाच्या इतर विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज केले आहे. महापुराचा सामना करण्यासाठी शहरात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेणारी मालिका आजपासून...
--------
महापुरातून धडा; आपत्तीशी दोन हात करण्याचा लढा

महापुराच्या इशाऱ्याने चिपळूण पालिकेची यंत्रणा कार्यान्वित होणार; ३०० कर्मचारी, ५०० स्वयंसेवकांसह आपत्ती व्यवस्थापन

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
महापुराचा सामना करण्यासाठी पालिकेने दोन महिन्यापासून तयारी सुरू केली आहे. पूर येण्याची वाट न बघता पूरपरिस्थितीचा इशारा मिळाला की, पालिकेची यंत्रणा कार्यान्वित होईल. नागरिकांचे स्थलांतर सुरू होईल. शहराचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शिव आणि वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेल्या चिपळूण शहराला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. गेल्या वर्षीच्या महापुरात चिपळूण पालिका नागरिकांच्या टिकेची धनी ठरली. यावर्षी तशी परिस्थिती होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रय़त्न सुरू आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दोन महिन्यापूर्वीच चिपळूण पालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. मदतकार्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीसह पालिकेत चोवीस तास नियंत्रण कक्ष व नागरिकांना सतर्क करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, १७ कर्मचाऱ्यांना यांत्रिक बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-----------
चौकट
धोकादायक झाडांची कटाई
भेगाळेसह शहरातील अंतर्गत मार्गावर असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची कटाई करण्यात आली आहे. महावितरणच्या तारा असलेल्या ठिकाणच्या फांद्या तोडण्यास पालिकेकडून प्राधान्य देण्यात आले आहे.
--------------
चौकट
नाले, गटार पऱ्हे स्वच्छ करण्यावर भर
शिवनदीतील गाळ काढण्यासह शहरातील नाले, पऱ्हे आणि गटारांची स्वच्छता करण्यात आली आहे. स्वच्छ केलेल्या गटारांमध्ये नागरिकांनी प्लास्टिकसह इतर कचरा टाकू नये, यासाठी प्रबोधन केले जात आहे. नाईक कंपनी येथील जुना पूल तोडण्यात आला आहे.
-------------
चौकट
मदतकार्यासाठी गटांचे नियोजन
पूरस्थितीत मदतकार्यासाठी पूर्वसूचना गट, शोध व सुटका, प्रथमोपचार, भोजन, निवारा व्यवस्था, पिण्याचे पाणी, शहर स्वच्छता असे गट तयार करण्यात आले आहेत. पालिकेतील अधिकाऱ्यांवर प्रत्येक गटाची जबाबदारी देण्यात आली आहे.
------------
ग्राफ करावा
एक नजर..
* महापुरात बचावकार्यासाठी पालिकेने लोकांना प्रशिक्षण दिलेः ११६
* पालिकेचे कर्मचारी बचावकार्यात सहभागी होतीलः ३००
* पाग कन्या शाळा येथे स्वयंसेवकांची राखीव टीमः ५०
-----------
चौकट
असे आहे ५ होड्यांचे नियोजन..
पेठमाग, गोवळकोट-१ होडी
शंकरवाडी मुरादपूर-१ होडी
बाजारपेठ-१ होडी
चिंचनाका पॉवर हाऊस-१ होडी
बेंदरकरआळी सांस्कृतिक केंद्र परिसर-१ होडी
-----------
चौकट
इथे होणार नागरिकांचे स्थलांतर
नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी शहरातील डीबीजे महाविद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कूल, पेठमाप उर्दू शाळा, प्राथमिक मराठी शाळा, गोवळकोट उर्दू शाळा, खेंड मराठी शाळा, जीवन शिक्षण मराठी शाळा येथे स्थलांतरित केले जाणार आहे. त्याशिवाय शहरातील शासकीय इमारतीही सज्ज करण्यात आल्या आहेत.
--------------
चौकट
महापुराच्या इशाऱ्यासाठी तीनवेळा भोंगा वाजणार
शिवनदीतील पाण्याची पातळी ४.५ मीटर इतकी झाली की, पालिकेकडून इशारा भोंगा वाजवला जाईल. त्यानंतर पाण्याची पातळी वाढली की प्रत्येक दहा सेंकदानंतर तीनवेळा भोंगे वाजवले जातील. तीनवेळा भोंगे वाजले की, शहरात पाणी वाढत आहे, हे नागरिकांनी समजावे.
-------------
चौकट
पाणी भरणारी ठिकाणे
भाजी मार्केट, बाजारपेठ, भाजीमंडई, गोवळकोट रोड, पेठमाप, चिंचनाका, भेंडीनाका, खाटीकआळी, मार्कंडी, काविळतळी, शंकरवाडी, मुरादपूर, बहादूर शेख नाका, देसाई मोहल्ला, मिठाघरी मोहल्ला, चिपळूण-कराड रोड, भोगाळे, पवारआळी, वेसमारूती मंदिर, उक्ताड, बेंदरकरआळी
-------------
कोट
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पुरेसे सहकार्य आणि साहित्य मिळाले आहेत. पुरावर मात करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी, नागरिक आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. पूर थांबवणे आमच्या हातात नाही; मात्र मोठी हानी टाळणे शक्य आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचीही मोठी मदत लागणार आहे.
- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67418 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top