
टुडे पान दोन मेन-''रायगड तीर्थक्षेत्रा''साठी प्रयत्न करा
टीपः swt१३१६.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - रायगड ः शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी तुलादान सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष सुनील पवार व शिवभक्त.
टीपः swt१३१७.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - रायगड ः राज्यभरातून रायगडावर जमा झालेल्या हजारोंच्या संख्येने शिवभक्त. (छायाचित्रे ः अजय सावंत)
''रायगड तीर्थक्षेत्रा''साठी प्रयत्न करा
सुनील पवार ः रायगडावर राज्याभिषेक दिन दिमाखात साजरा
अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः प्रत्येक स्वाभिमानी हिंदु व्यक्तीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच शिवराज्याभिषेक साजरा केला पाहिजे. रायगड तीर्थक्षेत्र होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी केले. पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत ऐतिहासिक रायगडावर काल (ता.१२) गडदेवता श्री शिरकाईपूजन, काशिविश्वेश्वरपूजन, छत्रपती शंभू महाराज जयंती, भवानी देवी काळकाई देवी पूजन, श्री जगदिश्वर पूजन, तुलादान सोहळा धार्मिक विधी गोंधळ आदिनी हा सोहळा पूजाअर्चा वेदमंत्र घोषात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्तांसाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे सोहळा आयोजित करण्यात येतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्याभिषेक दिन काल (ता.१२) जेष्ठ शुद्ध त्रयोदशीस पारंपरिक पद्धतीने वेद मंत्रघोषात राज्याभिषेक किल्ले रायगडावर दिमाखात साजरा करण्यात आला.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी रायगडच्या महादरवाजाला मंगल तोरण बांधून गडदेवता श्रीशिरकाई देवीचे पूजन केले गेले. समितीचे सर्व पदाधिकारी आणि आलेले शिवभक्त इथे आई भवानीचा जयघोष करतात. विशेष म्हणजे हमीदा खान या ठिकाणी गेली अनेक वर्ष या पूजेची तयारी करून स्वतः तिथे उपस्थितीत असतात. रायगडावरील दुसरे महत्वाचे देवस्थान म्हणजे काशीदेव होय. याची साग्रसंगीत शोडोपचार पूजा वेदमंत्रघोषात मोठ्या थाटामाटाने करण्यात आली. राज्याभिषेक दिनाच्या आधीच्या दिवशी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती महाराजांची जयंती रायगडावर राजसदरेवर छत्रपती शंभू महाराज जयंती समितीकडून साजरी केली जाते. रायगडावर अज्ञात काळापासून पूर्व कड्यातील दोन स्वयंभू देवता भवानी आणि काळकाई यांची स्थळे आहेत. त्याची पूजा अर्चा व मानपान अवघड जागी जावून केले जाते. श्रीजगदिश्वर देवाची महापूजा करण्यात आली. जगदीश्वराच्या भव्य प्रकाराची कणा रांगोळी काढून पताका बांधून सजावट केली होती. पूजा चालू असतानाच छत्रपती शिवरायांच्या पालखीचे आगमन जगदीश्वर मंदिरात होते. ढोलताशा तुतारीच्या गजरात शिवरायाच्या जयघोषात उल्हासात हे आगमन होते. तुलादानासाठी शिवभक्तांनी हातांनी अनेक पदार्थ आणलेले असतात. समंत्रक पूजा करून महाराजाची उत्सवमूर्ती तराजूच्या एका पारड्यात प्रतिष्ठित केली जाते. दुसऱ्या पारड्यात शिवभक्तांनी आणलेले पदार्थ ठेवतात. काही शिवभक्त स्थानिक विध्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य तुलेच्या निमित्ताने वाटतात. तुलादानातील इतर पदार्थ सर्व लोकांना प्रसाद रूपाने वाटतात. लोक या सोहळ्यासाठी दोन दिवस गडावर येवून तयारी करत असतात. राजसदरेवरील तुलादान समारंभ होताच देवीचा गोंधळ पारंपारिक पद्धतीने हा गोंधळ घालण्यात आला. छोट्या मशाली येवून संबळाच्या तालावर पुढे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होऊन उशिरापर्यंत चालतात. यावर्षी रात्र ही शाहिरांची रात्र हा कार्यक्रमाने विशेष गाजली.
-----------
चौकट
५० हजाराच्यावर शिवभक्त
रायगडावर येणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी समिती व अन्य सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध नियोजन असतेच. विशेष म्हणजे हजारो शिवभक्तांना अन्नदान करताना रात्री ८ वाजता महाप्रसादाला सुरुवात होते ते पहाटे चार वाजेपर्यंत हे अन्नदान केले जाते. त्यानंतर सकाळी पुन्हा तेवढ्याच शिवभक्तांना चहा नाष्टा दिला जातो. यावेळी ५० हजाराच्यावर शिवभक्त रायगडावर होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67447 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..