
बिले न मिळाल्यास ठेकेदारांचा आत्मदहन करण्याचा इशारा
बिले न मिळाल्यास
आत्मदहन करण्याचा इशारा
चिपळूण, ता. १३ः ठेकेदारांनी केलेल्या रस्ते व पुलांच्या कामांची बिले येत्या २५ जूनपर्यंत न मिळाल्यास ३० जूनला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ठेकेदार आत्मदहन करतील, असा इशारा चिपळुणातील ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यानुसार चालू आर्थिक वर्षातील ठेकेदारांनी कामे पूर्ण केली असून, मार्च २०२२ मध्ये केवळ १० टक्के रक्कम अदा करण्यात आली. त्या वेळी सर्व ठेकेदारांनी १ एप्रिलपासून रस्ते व पुलांची कामे बंद करण्याचा इशारा दिला होता; मात्र, आपण तुम्ही कामे पूर्ण करा, असे सांगितले होते. यानुसार सर्व ठेकेदारांनी कामे पूर्ण केली आहेत. १३ जूनपर्यंत देयके अद्याप मिळाली नाहीत. त्यामुळे येत्या २५ जूनपर्यंत बिले न मिळाल्यास ३० जूनला सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ठेकेदार आत्मदहन करतील, असा इशारा ठेकेदारांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, उपाध्यक्ष सुरेश पवार, राहुल गोपाळ, केतन पवार, सचिन पाकळे, राजेंद्र बेर्डे, तौसिफ खलपे, दिनेश शिंदे, श्रीधर खेतले, राम नार्वेकर, मल्लू राठोड, साहिल कदम, मंगेश माटे, रणजित डांगे, दीपक डोंगरे, राकेश माळी, अशोक राठोड, दशरथ दाभोळकर, तातोबा चव्हाण आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67503 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..