
वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी सावंतवाडी बाजारपेठेत गर्दी
L28886
- सावंतवाडी ः वटपौर्णिमेचे साहित्य खरेदी करताना महिला. (छायाचित्र ः रोहन गावडे)
वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी
सावंतवाडी बाजारपेठेत गर्दी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः वटपौर्णिमा सण उद्या (ता. १४) असल्याने येथील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. या सणासाठी आवश्यक अननस, आंबे, फणस, केळी, पेरू, वडाची पाने, दोर आदी साहित्य घेऊन गावागावातून विक्रेते शहरात दाखल झाले होते.
हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला फार मोठे महत्त्व आहे. या सणादिवशी सुहासिनी महिला वडाची पूजा करतात. तसेच आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य व जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करतात. हा सण उद्या होत असल्याने या सणाला लागणारे साहित्य येथील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले होते. यात परप्रांतीय व्यापाऱ्यांसह ग्रामीण भागातील लहान-मोठ्या विक्रेत्यांचाही समावेश होता. वटपौर्णिमेसाठी आवश्यक असलेली आंबा, फणस, चिकू, पेरू, अननस आदी फळे तसेच वडाची पाने, दोर, काकणांचे जोड आदी साहित्याने बाजारपेठ फुलली होती. पावसानेही काहीशी विश्रांती घेतल्याने साहित्य खरेदीसाठी महिला वर्गासह नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनाने मेटाकुटीस गेलेल्या व्यापाऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67508 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..