रत्नागिरी- ः क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- ः क्राईम
रत्नागिरी- ः क्राईम

रत्नागिरी- ः क्राईम

sakal_logo
By

रिक्षाचालकांना लुबाडणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा

सहा जणांचा समावेश; परप्रांतीय टोळीचा हात; जिल्ह्यातील पहिलीच घटना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः रिक्षा चालकांना गुंगीचे औषध देऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह परप्रांतीय टोळीने हेरून लुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिक्षाचालकाना हेरून लुटण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकार आहे. सीसीटिव्ही फुटेज तसेच अन्य माध्यमातून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
आशिष संजय किड्ये (वय २९, रा. धनजीनाका) आणि विनेश मधुकर चौगुले (वय ४५, रा. कसोप, रत्नागिरी) अशी लुबाडलेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी दोन व सायंकाळी सहाच्या सुमारास परटवणे व चंपक मैदान येथे निदर्शनास आली. या परप्रांतीय टोळीत संशयित पर्यटकांनी रिक्षा चालकांना त्याच्या सुशोभित रिक्षा व त्यांच्याकडील दागदागिने पाहून हेरले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आशिषला सकाळी आठ वाजता शहर बसस्थानक येथे तर विनेश याला तेली आळी येथे संशयितांनी गाठले. संशयित पर्यटकांनी श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे जाण्याचे सांगितले. दोन्ही रिक्षा गणपतीपुळे येथे रवाना झाला होत्या.
या प्रकरणी रविवारी (ता. १२) शहर पोलिस ठाण्यात परप्रांतीय टोळीतील अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास शहर पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासात पोलिस पथक, सीसी टिव्ह फुटेज व इतर माध्यमाचा उपयोग करून तपासाला गती देण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक आकाश सांळुखे यांनी सांगितले.
..
चौकट
दोघांकडून सुमारे सव्वा लाख लुटले
दरम्यान, पर्यटक गणपती मंदिरात गेले होते. दोघेही रिक्षा चालक बाहेर होते. मंदिरातून आल्यावर पर्यटकांनी दोघांनाही प्रसाद दिला. त्यानंतर काय घडले कळलेच नाही. यातील आशिष याला नेवरे गावच्या पुढे आपण कसे आले कळले नाही. त्याच्याकडील ७८ हजार रुपयांचा ऐवज लुटला तर विनेश कडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात पर्यटकांनी पळविला. आशिष रिक्षासह बेशुद्ध अवस्थेत परटवणे-साईमंदिर येथे दोन वाजता आढळला तर विनेश हा सायंकाळी सहा वाजता चंपक मैदान येथे बेशुद्ध सापडला. दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सोमवारी (ता. १३) उपचारानंतर त्यांना सोडले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67569 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top