खेळाडूंना युवा सेनेकडून सायकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाडूंना युवा सेनेकडून सायकली
खेळाडूंना युवा सेनेकडून सायकली

खेळाडूंना युवा सेनेकडून सायकली

sakal_logo
By

rat14p1.jpg-
29010
रत्नागिरी - आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल भेट देताना शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी.

खेळाडूंना युवा सेनेकडून सायकली
आदित्य ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त वाटप; खो-खोपट्टूंना सहाय्य
रत्नागिरी, ता. १४ः होतकरु खो-खोपटूंना साह्य करण्यासाठी रत्नागिरीतील युवासेना सरसावली असून दोन खेळाडूंना सायकल प्रदान करण्यात आली. शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि युवासेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये होतकरु खेळाडूंसाठी युवासेनेकडून पुढाकार घेण्यात आला.
खेळाडूंना सहकार्य करण्याची संकल्पना युवा तालुकाधिकारी तुषार साळवी यांनी मांडली होती. त्यानुसार श्रेया सनगरे आणि साक्षी डाफळे या दोघींना सायकल भेट देण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर गेले अनेक वर्षे खो-खोचा सराव सुरु असून यामध्ये आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. या मैदानावर सकाळ-संध्याकाळ नियमित सराव होत असून विविध शाळांमधील मुली-मुले येत असतात. सर्वसामान्य कुटूंबातील या मुलांना घडवण्याचे काम या मैदानावर केले जाते. त्यांना मदतीचा हात म्हणून युवासेना आणि शिवसेनेकडून मदतीचा हात दिला गेला. त्यांच्यासाठी राज्याचे माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे मेहनत घेत आहेत. उपस्थित मान्यवरांनी खो-खोच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उद्योजक अण्णा सामंत, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी उपनगराध्यक्ष बाळू साळवी, रत्नागिरीचे तालुका युवाअधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभि दुडये, मनोज साळवी, शहर संघटक प्रसाद सावंत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67668 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top