रत्नागिरी- जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे नव्याने मुल्यांकन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे नव्याने मुल्यांकन?
रत्नागिरी- जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे नव्याने मुल्यांकन?

रत्नागिरी- जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे नव्याने मुल्यांकन?

sakal_logo
By

29064 ः संग्रहीत
.....
इंट्रो
रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जैतापूरमधील तिसऱ्या पिढीच्या तंत्रज्ञानाच्या सहा रिअॅक्टरचा अणुऊर्जा प्रकल्पाची केंद्र सरकारचे अणुऊर्जा खाते फ्रेंच सरकारच्या तांत्रिक व व्यावसायिक सहकार्याच्या प्रस्तावाचे गांभीर्याने अध्ययन करत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतामधील अणुऊर्जा प्रकल्पावर परिणाम होतो आहे. विशेषकरून कुदनकुलम प्रकल्पातील यंत्रसामुग्री रशिया-युक्रेनमधून वेळेवर येणे मोठे जिकिरीचे होणार आहे. केंद्र सरकार फ्रेंच कंपनी ईडीएफसोबत तांत्रिक व्यावसायिक चर्चा करत आहे. त्या निमित्ताने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची तुलनात्मक नोंद घेणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग.
- अॅड. विलास पाटणे
----------------------------------------------------
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे नव्याने मूल्यांकन?

१६५० मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या फ्रान्स सरकारच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जाणार आहेत. एकूण ९९०० मेगावॅट क्षमतेचे देशातील सर्वात मोठे अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर येथे उभारण्याचे २०१० मध्ये ठरले होते. देशात सध्या स्थापित अणुऊर्जा ६७८० मेगावॅट आहे. देशातील २० अणुऊर्जा प्रकल्पांनी आतापर्यंत ७५५ अब्ज युनिट वीज निर्माण केली असून, ६५० दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनाची बचत झाली. जगात एकूण ३० देशांमध्ये अणुऊर्जेचे ४३९ प्रकल्प आहेत. एकूण जागतिक उत्पादनाच्या १७ टक्के उत्पादन अणुऊर्जेतून उभारले जात आहे. वीस अणुप्रकल्प असलेल्या भारताचा अणुऊर्जा निर्मितीत जगात सहावा क्रमांक आहे. फ्रान्समध्ये ८० टक्के, अमेरिकेत २६ टक्के, ब्रिटनमध्ये २४ टक्के अणुऊर्जा वापरात आहे.
अणुऊर्जा भट्टीतील प्रक्रियेतून कोणताही रासायनिक वायू पदार्थ उत्सर्जित होत नाही. रासायनिक सांडपाणी उत्सर्जित होत नसल्याने जलप्रदूषण नाही. एक ग्रॅम युरेनियमपासून तीन हजार किलो कोळसा जाळल्यानंतर जितकी ऊर्जा प्राप्त होते, तितकी ऊर्जा मिळते. डिसेंबर २००४ मध्ये जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात मोठा १० रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होऊनही कल्पकम् (तामिळनाडू) अणुभट्टीत कोणताही बिघाड झाला नाही. याउलट जैतापूरची जागा २४ मीटर उंचीवर व खूपच सुरक्षित आहे.
२८ नोव्हेंबर २०१० रोजी एक लाख कोटी गुंतवणूकीच्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता मिळाली. जैतापूर समुद्राजवळ आहे, तरीही समुद्रपातळीपेक्षा उंचावर आहे. अशा मोठ्या प्रकल्पाकरिता खूप पाणी लागत असल्याने व ते समुद्रात उपलब्ध असल्याने प्रकल्पाकरिता जैतापूर एक योग्य जागा आहे. ८८० मेगावॅट क्षमतेचा कैगा अणुऊर्जा प्रकल्पामुळे अतिशय घनदाट जंगलातील प्राचीन जैवविविधतेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात दुर्घटना झाल्याने अणुभट्ट्यांच्या परिसरातील पर्यावरणाला धोका आहे, असे म्हणत कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मद्रास हायकोर्टात जनहित याचिका फेटाळताना प्रकल्पाची सुरक्षितता, पर्यावरण, तंत्रज्ञान या सर्व बाबींचा समग्र विचार करत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत न्यायालयाने प्रकल्पाची गरज अधोरेखित केली. तरीदेखील परत परत फुकुशिमाचा विषय चघळला जातो. रशियाच्या तंत्रज्ञानावर दोन हजार मेगावॅट युनिटचे प्रकल्प कुदनकुलममध्ये कार्यान्वित असताना अलिकडे अधिक चार रिअॅक्टरची भर पडली. लाईट वॉटर रिअॅक्टर (भूतलावरील पाण्यावर चालणारी अणुभट्टी) रशिया करत आहे. तसेच आंध्रप्रदेशमधील कोवाडा प्रकल्पात अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर सहा रिअॅक्टरचे नव्याने काम सुरू झाले.
( क्रमशः)
(लेखक कोकणविषयक प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67707 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top