रत्नागिरी- ःसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- ःसंक्षिप्त
रत्नागिरी- ःसंक्षिप्त

रत्नागिरी- ःसंक्षिप्त

sakal_logo
By

स्वरूपानंद ग्रंथालयात
शिवस्वराज्य दिन साजरा
रत्नागिरी ः शहरातील कुवारबाव येथील स्वरूपानंद ग्रंथालय परिसरातर्फे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा झाला. कुवारबावच्या सरपंच मंजिरी पाडाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपसरपंच सचिन कोतवडेकर व सर्व सदस्यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. या वेळी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील हंबीरराव आणि शिवाजीराजे यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा भाग श्रीकांत पाटील यांनी साभिनय सादर केला. त्यानंतर विनायक हातखंबकर यांनी वि. वा. शिरवाडकर यांची आग्राचा किल्ला ही कविता तर रामदास स्वामींनी रचलेली निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू ही गीतरचना नुपूर पाष्टे हिने सादर केली. दिलीप रेडकर यांनी शिवाजी राज्याभिषेकबाबत माहिती दिली. युगांयुगांची रात्र संपली..प्रभात झाली, या कानेटकरांच्या रायगडाची भूपाळीने कार्यक्रमाची सांगता झाली.
------
नवनिर्माण कॉलेजचे यश
रत्नागिरी ः येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७. ७६ टक्के लागला. यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के तर कला व विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के लागला. वाणिज्य शाखेमधील झोयेब बांगी याने ९३. ३३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. विज्ञान शाखेची साक्षी सागवेकर, सलोनी नाचणकर, तलविया तांबे, कला शाखेतील ओंकार चौगुले, प्रदीप करपे, संतोषी बाबरने अनुक्रमे क्रमांक मिळवले. बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, त्याबरोबर संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-------
हेगशेट्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या
४५ विद्यार्थ्यांची निवड
रत्नागिरी ः येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या ४५ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून देशभरातील हॉटेल्समध्ये विविध विभांगामध्ये निवड झाली. देशातील रॉयल ऑरचिड हॉटेल पुणे, द ऑरचिड, ताज विवांता गोवा, रिओ रिसॉर्ट गोवा, मेट्रोपॉलिटन जयपूर, सूर्यगड जयसलमेर, विटस अंधेरी, फोर पॉइंट वाशी, रिजेंटा बाय रॉयल ओचिड पुणे, संगम रेजन्सी, हयात पुणे, डेला रिसॉर्ट लोणावळा, जेडब्ल्यू मारिएत सहर, सयाची हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी थ्री स्टार, फाईव स्टार अशा नामांकित हॉटेल्समध्ये फ्रंट ऑफिस, फूड अॅंड बेव्हरेज, हाऊस किपिंग, प्रॉडक्शन अशा विविध विभागामध्ये ही निवड झाली. विद्यार्थ्यांच्या मुलाखती विविध हॉटेल्समधून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. तसेच प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून हैद्राबाद, पुणे, नाशिक, मुंबई, गोवा, गुजरात अशा विविध ठिकणाच्या हॉटेल्समध्ये सहा महिन्याच्या इंटर्नशिपसाठी ६० विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67719 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top