
रायगडावर लोटला जनसागर
swt१४४.jpg व swt१४५.jpg
२९०७२, २९०७३
रायगड ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, सुनील पवार, भरतशेठ गोगावले, श्री. म्हात्रे. दुसऱ्या छायाचित्रात शिवराज्याभिषेक सांगता सोहळ्यात होळीचा माळ येथे ध्वजारोहणप्रसंगी राज्यभरातील शिवभक्त. (छायाचित्रे ः अजय सावंत)
रायगडावर लोटला जनसागर
शिवराज्याभिषेक सोहळाः डोळ्यांचे पारणे फेडणारे कार्यक्रम साजरे
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडगडावर ३४९ व्या राज्याभिषेक सोहळ्याला शिवभक्तांचा, शिवप्रेमींचा जनसागर लोटला होता. या दिमाखदार सोहळ्याची सांगता मर्दानी खेळ, मल्लखांब, लेझीम अशा विविध कार्यक्रमानी झाली. पुढील वर्षी ३५० वा राज्याभिषेक सोहळा सात दिवस करण्यासाठी समितीने सर्वाच्या सहकार्याने पावले टाकली आहेत.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे १२ जूनला राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे शिवरायांची पालखी निघून नगारखान्यासमोर ध्वजारोहण झाले. ढोलताशांच्या गजरात शिवरायांच्या पालखीने राजसभेत प्रवेश केला. मुख्य सिंहासन चौथऱ्यावर वेदमंत्र घोषात धार्मिक विधी होऊन महाराजांना निरनिराळ्या गडावरील आणि तीर्थक्षेत्रातून आणलेल्या जलकुंभातून अभिषेक झाला. यानंतर महाराजांचे सिंहासनारोहण झाले. महाराजांच्या जयघोषाने अखंड रायगड थरथरला. महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाला. राजदर्शनानंतर शिवरायांची पालखी नगारखान्यातून पुष्पवर्षावात मिरवणुकीकरिता निघाली. पालखी होळीच्या माळावर आली. तिथे पालखी काही काळ विसावली. होळीच्या माळावर तेथील शिवरायांच्या प्रतिमेला मानवंदना दिली. मर्दानी खेळ, मल्लखांब, लेझीम इत्यादी खेळ करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात गड दणाणत होता. तिथून पालखी श्रीजगदीश्वर मंदिरात रवाना झाली. तिथे महाआरती होऊन राज्याभिषेक सोहळा झाला.
कार्यक्रमासाठी मंत्री, विश्व हिंदू परिषद, शंकर गायकर, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रुपेश म्हात्रे, स्वागताध्यक्ष आमदार भरतशेट गोगावले, श्री शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सचिव समीर वारेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र देसाई, कार्याध्यक्ष सनी ताठेले, पंकज भोसले, सुनील कदम, रायगड स्मारक अध्यक्ष आरमार प्रमुख कानोजी आंग्रे यांचे १३ वे वंशज रघुजीराजे आंग्रे, कार्याध्यक्ष सुधीर थोरात, सयाजी बांदल घराण्याचे वंशज अनिकेत राजे, जेदे घराण्याचे वंशज इंद्रजित जेदे, खुटवड पाटील घराण्याचे वंशज गणेश खुटवड-पाटील, राज्यभरातील शिवभक्त, शिवप्रेमी, पर्यटक, मान्यवर उपस्थितीत होते. तसेच स्वा. वी. सावरकर स्मारक मंडळ, दादर, कोकणकडा मित्र मंडळ महाड-दुर्गवीर प्रतिष्ठान टीम दातेगड, अजिंक्य हायकर्स बदलापूर, आपला कट्टा ऐरोली, युवा मंच कांदिवली, सह्यादी प्रतिष्ठान अशा अनेक संस्था समितीच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केला. शिवराज्याभिषेक सोहळ्यात यजमान म्हणून पूजेचा मान समितीचे पंकज भोसले दांपत्याना मिळाला.
कोट
दुर्गराज रायगड समितीने गेली २८ वर्ष श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही संस्था महाराष्ट्रातील सुमारे ६० संस्थांना घेऊन राज्याभिषेक सोहळा साजरा करतात. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम अनेक वर्षे समिती करत आहे. जून २०२३ मध्ये न भूतो न भविष्यती असा दैदिप्यमान सोहळा होणार आहे.
- सुनील पवार, अध्यक्ष, श्री शिवराज्याभिषेक समिती
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67727 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..