कुडाळात शिवसेनेतर्फे संगणक संच प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात शिवसेनेतर्फे
संगणक संच प्रदान
कुडाळात शिवसेनेतर्फे संगणक संच प्रदान

कुडाळात शिवसेनेतर्फे संगणक संच प्रदान

sakal_logo
By

L२९०७०

ओळ - कुडाळ ः आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून येथील वाचनालय व महिला मंडळास संगणक संच प्रदान करण्यात आला. (छायाचित्र ः अजय सावंत)


कुडाळात शिवसेनेतर्फे
संगणक संच प्रदान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून (कै.) सौ. विजया वामन पाटणकर वाचनालय व ग्रंथ संग्रहालय कुडाळ तसेच महिला मंडळ कुडाळ या संस्थेस संगणक संच प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर कुडाळ शिवसेनेच्यावतीने आमदार नाईक यांच्या हस्ते कुडाळ क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, अतुल बंगे, संजय भोगटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, संतोष अडूळकर, रुपेश पावसकर, सचिन काळप, राजू गवंडे, अब्बास करोल, गुरु गडकर, चेतन पडते, महिला मंडळ कुडाळच्या मेघा सुकी, वाचनालयाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटणकर, विठ्ठल पाटणकर, ग्रंथपाल प्रसाद जाधव, लिपिक अस्मिता कुडाळकर, बापू सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67728 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top