राजापूर ः आरक्षण बहुतांश विद्यमानाना अनुकूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  आरक्षण बहुतांश विद्यमानाना अनुकूल
राजापूर ः आरक्षण बहुतांश विद्यमानाना अनुकूल

राजापूर ः आरक्षण बहुतांश विद्यमानाना अनुकूल

sakal_logo
By

rat14p8.jpg
29058
ः राजापूर ः शहर नगर पालिका.
...
बहुतांश आरक्षण विद्यमानांना अनुकूल

राजापूर तालुका; पुरुष उमेदवारांमध्ये रस्सीखेच
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः राजापूर नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काल (ता. १३) झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असल्या तरी, हे आरक्षण बहुतांश विद्यमान नगरसेवकांना अनुकूल राहिले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना पुन्हा एकदा निवडणुकीची आखाड्यात उतरण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचवेळी सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेल्या दहा जागांवर उमेदवारीची संधी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये विशेषतः पुरुष उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे.
मुदत संपलेल्या येथील नगरपालिकेच्या निवडणुकासाठी तयारी सुरू झाली आहे. नगरसेवकांच्या २० जागांसाठी काल ता. १३ रोजी आरक्षणाची सोडत झाली. या आरक्षण सोडतीमध्ये वीसपैकी दहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत तर, उर्वरित जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने त्या ठिकाणी पुरुष वा महिला यापैकी कोणालाही निवडणूक लढवता येणार आहे. या साऱ्‍यामध्ये वीसपैकी केवळ एक जागा अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित आहेत. उर्वरित १९ जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे विद्यमानांपैकी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग-५ मधील एका जागेव्यतिरिक्त अन्य जागांवर विद्यमान नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. महिलांच्या तुलनेमध्ये पुरुष इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. अशा स्थितीमध्ये संख्येने जास्त असलेल्या इच्छुक पुरुषांमधून अंतिम उमेदवारांची निवड करणे राजकीय पक्षांसमोर आव्हान राहणार आहे. त्यामुळे उमेदवारी निश्‍चिती करताना राजकीय पक्ष नेतृत्वाचा कस लागणार आहे.
....
चौकट
फारसे प्रयास पडणार नाहीत
दहा जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तेथे सक्षम, दांडगा जनसंपर्क, जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या महिला उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान आव्हान राजकीय पक्षांसमोर राहणार आहे. मात्र, शिवसेना, काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांचा विचार करता त्यांच्याकडे महिला पदाधिकारी वा कार्यकर्त्यांची वानवा दिसत नाही. त्यामुळे या प्रमुख राजकीय पक्षांना सक्षम महिला उमेदवाराचा शोध घेण्यामध्ये फारसे प्रयास करावे लागणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
-------------------------
चौकट
१०५ मतदार अनुसूचित जातीचे
महिलांसाठी राखीव असलेल्या दहा जागांपैकी अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असलेल्या एका जागेचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्यांदा अनुसूचित जातीची महिला नगर पालिकेमध्ये नगरेसवक म्हणून नेतृत्व करणार आहे. या मतदार संघामध्ये सुमारे १०५ मतदार अनुसूचित जातीचे असून त्याच्यातून राजकीय पक्षांना महिला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
...
एक नजर...
आरक्षण सोडतीमध्ये महिलांसाठी आरक्षित ः१० जागा
वीसपैकी केवळ अनुसूचित जाती महिला आरक्षितः १ जागा
उर्वरित सर्वसाधारणसाठी आरक्षित ः १९ जागा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67750 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top