चिपळूण ः लोटिस्मा कलादालनास बदिउज्झमान खावर, महंमद खडस यांची तैलचित्रे भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः लोटिस्मा कलादालनास बदिउज्झमान खावर, महंमद खडस यांची तैलचित्रे भेट
चिपळूण ः लोटिस्मा कलादालनास बदिउज्झमान खावर, महंमद खडस यांची तैलचित्रे भेट

चिपळूण ः लोटिस्मा कलादालनास बदिउज्झमान खावर, महंमद खडस यांची तैलचित्रे भेट

sakal_logo
By

rat14p14.jpg
L29095
-चिपळूण ः येथील लोटिस्मात गझलकार बदिउज्झमान खावर आणि चिपळूण तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक, नेते महंमद खडस यांची तैलचित्रे प्राप्त झाली. त्या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक, राष्ट्रपाल सावंत, प्रकाश घायाळकर, जाफर गोठे, महंमद झारे आदी.
...
लोटिस्माला कवी खावर, महंमद खडस यांची तैलचित्रे प्राप्त

कलादालनात भर; तुरुंगातील जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या कलादालनातील तैलचित्र संग्रहास नुकतीच (९ जून) दापोली तालुक्यातील ज्येष्ठ कवी, शायर, गझलकार बदिउज्झमान खावर आणि चिपळूण तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक तथा नेते महंमद खडस यांची तैलचित्रे प्राप्त झाली. ही तैलचित्रे चिपळूणच्या कलाकार प्रज्ञा इंगवले आणि देवरुखच्या परांजपे यांनी काढली आहेत.
सुरेश भटांनंतरच्या कालखंडातील मराठी गझलकारांमध्ये जी नावे अग्रेसर आहेत, त्यात बदिउज्झमान खावर यांचे नाव आहे. मराठी गझल समृद्ध करण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी एकूण ११३ गझला लिहिल्या होत्या. बदिउज्झमान खावर यांच्या उर्दू आणि मराठीत रचना, त्यांचे काव्यसंग्रह, त्यांना मिळालेले पुरस्कार याबद्दलची माहिती साहित्यिक मुजफ्फर सय्यद यांनी दिली. याच कार्यक्रमात अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रकाश देशपांडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा रत्नाकर कुलकर्णी स्मृती मसाप शाखा कार्यकर्ता मिळाल्याबद्दल अरुण इंगवले यांचा चिपळूण मुस्लिम साहित्य प्रेमींच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक, राष्ट्रपाल सावंत, प्रकाश घायाळकर, जाफर गोठे, महंमद झारे, पाथरे, रमेश चिपळूणकर उपस्थित होते. या तैलचित्रांच्या समावेशाने लोटिस्मा कलादालन अधिक समृद्ध झाल्याची भावना वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी व्यक्त केली.
------------------
चौकट
भिन्न विचारसरणीचे कार्यकर्ते..
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी महमंद खडस यांच्या आठवणींना उजाळा दिला. आणीबाणीच्या काळातील तुरुंगातील प्रसंग सांगून त्या काळात भिन्न विचारसरणीचे कार्यकर्ते एकमेकांशी कसे प्रेमाने वागत होते, हे स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67762 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top