टुडे पान एक-रेडीतील रस्ताप्रश्न सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-रेडीतील रस्ताप्रश्न सोडवा
टुडे पान एक-रेडीतील रस्ताप्रश्न सोडवा

टुडे पान एक-रेडीतील रस्ताप्रश्न सोडवा

sakal_logo
By

29135
रेडी ः येथील श्री देव घंगाळेश्वर देवस्थान.


रेडीतील रस्त्याचा प्रश्न सोडवा

सरपंचांना निवेदन ः देव घंगाळेश्वर देवस्थानकडे जाणारा मार्ग

वेंगुर्ले, ता. १४ ः रेडी येथील श्री देव घंगाळेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर रेडी पोर्टतर्फे काही बंधने घातली आहेत. ती त्वरित काढून टाकावीत अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रेडी ग्रामस्थांनी सरपंचांना दिला. तसेच या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, श्री देव घंगाळेश्वर हे रेडीतील एक जागृत देवस्थान आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती अशी या देवस्थानाची ख्याती आहे. हे देवस्थान समुद्रकिनारी वसले आहे. रेडीतील प्रसिद्ध धार्मिकस्थळ व पर्यटनस्थळ म्हणून ते नावारूपास येत आहे. या देवस्थानवर प्रत्येक रेडीवासीयांची अतोनात श्रद्धा आहे; पण त्याचबरोबर रेडी पंचक्रोशीबरोबरच गोवा, कर्नाटक या भागातून रेडी तसेच रेडीतील सुप्रसिद्ध द्विभुजा गणपतीच्या दर्शनासाठी आलेले भाविक या देवस्थानला भेट देत आहेत. अशा या देवस्थानकडे जाण्यासाठी सिद्धेश्वर मंदिराकडून एक रस्ता व गणपती मंदिराकडून दुसरा रस्ता असे दोन रस्ते मागील असंख्य वर्षापासून आहेत. त्याच रस्त्याने येथील स्थानिक तसेच बाहेरून येणारे भाविक या ठिकाणी येतात. या रस्त्याने रेडीतील खनिज कंपन्यांचे खनिज वाहतूक मागील कित्येक वर्षापासून चालू आहे. काही कंपन्यांनी या रस्त्याने आपल्या खनिज वाहतूक करून करोडोंचा व्यवसाय केला. हल्ली रेडी पोर्टने आल्यापासून या रस्त्याने जाणाऱ्या भाविक भक्तांना किंवा बागायतीमध्ये जाणाऱ्या स्थानिकांना त्रास देण्यास सुरुवात करून देवस्थान व माड-बागायतीमध्ये सुरुवातीला या दोन्ही रस्त्याने गेट लावले. त्यावेळी स्थानिक व भाविकांना देवस्थान व आपल्या माड बागायतीमध्ये जाण्यास कोणतीही आडकाठी होणार नसल्याचे सुरुवातीला सांगितले होते. म्हणून रेडीच्या सुज्ञ लोकांनी त्याला त्यावेळी विरोध केला नव्हता; मात्र आता जाण्यास बंधने घातली आहेत. स्वतःचे वाहन तेथे नेता येणार नाही, प्रत्येक वेळी जाताना गेट पास एन्ट्री करणे अशी बंधने असून, ती दूर करावीत. यावेळी माजी पंच सदस्य चक्रपाणी गवंडी, शशिकांत गवंडी, जगदीश गवंडी, नंदकुमार मांजरेकर, शंकर गोसावी, नारायण गवंडी, अरुण गवंडी, रोहित गवंडी, आनंद आसोलकर, स्वप्नील गवंडी, दादा राणे, नितीन सावंत, शरद गोसावी, देविदास मांजरेकर, पंच सदस्य श्रीकांत राऊळ, गायत्री सातोस्कर हेही उपस्थित होते.
--
काही मागण्या
शांततापूर्ण मार्गाने हा विषय मिटवावा. अन्यथा कंपनीने आडमुठी भूमिका स्वीकारली, तर मात्र ग्रामस्थांना कंपनीविरोधात आंदोलन करावे लागेल. याची जाणीवही कंपनीला करून द्यावी. स्थानिकांना, भाविकांना, पर्यटकांना गेटमधून मंदिराकडे जाताना कोणत्याही गेट पास किंवा परवानगीशिवाय जाण्यास मिळावे अन्यथा कंपनीने पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशीही मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67804 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top