नांदगावात अपघातांची मालिका थांबेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगावात अपघातांची मालिका थांबेना
नांदगावात अपघातांची मालिका थांबेना

नांदगावात अपघातांची मालिका थांबेना

sakal_logo
By

29163
नांदगाव ः अपघातग्रस्त मोटार.

पेट्रोल संपल्याने थांबलेल्या
मोटारीला वाहनाची धडक

नांदगाव अपघातात पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
नांदगांव, ता. १४ ः मुंबई-गोवा महामार्गावर रोज एक अपघात घडत असून या भागाला सध्या अपघातांची मालिकाच सुरू असल्याचे दिसते. आजही पहाटे तीनच्या सुमारास नांदगाव ओटव फाटा पुलावर पेट्रोल संपल्याने थांबलेल्या मोटारीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एकजण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याकडून मुंबईकडे जात असलेली इको कार नांदगाव ओटव फाटा ब्रिजवर पेट्रोल संपले म्हणून बाजूला थांबविली होती. यावेळी मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या मोटारीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारीत असलेले चारजण जखमी झाले व एकजण गंभीर जखमी झाला. जखमींना नांदगाव रुग्णवाहिकेतून व काहींना १०८ रुग्णवाहीकेमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदगाव सेवा रस्त्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ओटव फाटा ब्रिज जवळील रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरी नांदगाव तिठा येथील सेवा रस्त्याचा प्रश्न अद्याप तसाच आहे. कित्येक अपघात हे सेवा रस्ता नसल्याने घडत आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजकर, दिपक मोरजकर, संकेत बिडये, भुपेश मोरजकर, प्रतिक भाट आदींनी धाव घेऊन मदतकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67839 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top