नगरपंचायतींचे सहाय्यक अनुदान रोखल्याने नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपंचायतींचे सहाय्यक अनुदान रोखल्याने नाराजी
नगरपंचायतींचे सहाय्यक अनुदान रोखल्याने नाराजी

नगरपंचायतींचे सहाय्यक अनुदान रोखल्याने नाराजी

sakal_logo
By

नगरपंचायतींचे सहाय्यक
अनुदान रोखल्याने नाराजी
प्रमाणपत्रही सादर ;कर्मचारी मे महिन्याच्या वेतनाशिवाय
रत्नागिरी, ता. १४ ः उपयोगिता प्रमाणपत्र सादर करुनही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच पालिका, नगरपंचायतींचे सहाय्यक अनुदान रोखण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यातील पालिका, पंचायती यांना शासनामार्फत कर्मचारी वेतनासाठी सहाय्यक अनुदान दिले जाते. त्यातून अधिकारी, कर्मचार्‍यांचे मासिक वेतन देण्यात येते. त्यासाठी सहाय्यक अनुदान उपयोगिता प्रमाणपत्र आनलाईन भरुन देण्याची अट आहे. राज्यातील ६७ पालिका वगळता अन्य पालिकांनी आपली प्रमाणपत्रे सादर केली आहे. यापुर्वी प्रमाणपत्र सादर केलेल्या नगर पालिका,पंचायतींना नगर विकास विभागामाफत सहाय्यक अनुदान वितरित केले जात होते. मात्र आता नव्याने सहआयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्यानी नवा नियम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतीची सहाय्यक अनुदान उपयोगिता प्रमाणपत्र आल्याशिवाय एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेला सहाय्यक अनुदान न देण्याची भूमिका घेतली आहे. त्या फटका अधिकाऱ्यासह कर्मचार्‍यांना बसला आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर पालिकांसह लांजा, देवरुख, गुहागर, दापोली, मंडणगड नगर पंचायतींनी आपली सहाय्यक अनुदान उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेत सादर केली आहेत. तरीही सह आयुक्तांच्या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मेमध्ये वेतनाशिवाय राहावे लागले आहे.
जूनमध्ये दोन आठवडे संपलेतरी नगर विकास विभागाने अनुदान न दिल्याने आता कर्मचारी संघटनांनी आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली त्याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होणार आहे. याकडे नगर विकास मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी संघटनांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67871 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top