रेल्वेखाली आत्महत्या करणारी महिला मालवणची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेखाली आत्महत्या करणारी महिला मालवणची
रेल्वेखाली आत्महत्या करणारी महिला मालवणची

रेल्वेखाली आत्महत्या करणारी महिला मालवणची

sakal_logo
By

रेल्वेखाली आत्महत्या
करणारी महिला मालवणची

मळगाव घटनेतील ओळख पटली

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः मळगाव येथे रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव ज्योती चंद्रकांत गोलतकर (रा. मालवण चिंदर-सडावाडी) असे आहे. पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी ही माहिती दिली. मुंबई-मालाड येथील चष्माच्या दुकानातून ही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
मळगाव रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पुलाखाली अज्ञात महिलेचा काल (ता.१३) मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या महिलेने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला होता. या महिलेकडे पिशवीत सापडलेल्या मुंबई-मलाड येथील चष्म्याच्या दुकानाशी सावंतवाडी पोलिसांनी संपर्क साधला तेथून त्यांच्या मुलाचा नंबर घेण्यात पोलिसांना यश आले. अंगावरील कपड्यावरून प्राथमिक तपासात या महिलेची ओळख पटली. ही महिला मालवण-चिंदर येथील असून ती निवृत्त शिक्षिका आहे. मूळची गुजरात येथील असून त्यांचा विवाह मालवण-चिंदर येथील उद्योजकाशी झाला होता. त्यांना दोन मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेच्या दिवशी ती सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशनवर उतरली होती. तेथून तिला मालवण-चिंदर गावी जायचे होते; मात्र, त्या उशिरापर्यंत घरी पोहचल्याच नाही, अशी माहिती पुढे आली. सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. मुलाशी संपर्क झाल्यावर मालवण येथून आलेल्या मॅनेजरने ओळख पटविली. उद्या (ता.१५) त्यांचा मुलगा सावंतवाडीत आल्यावर त्यांचा मृतदेह ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67926 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top