पिंगुळी उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळी उपकेंद्राच्या 
इमारतीची दुरवस्था
पिंगुळी उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था

पिंगुळी उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था

sakal_logo
By

L29260

- पिंगुळी ः येथील शासकीय आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची अवस्था.

पिंगुळी उपकेंद्राच्या
इमारतीची दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः पिंगुळी येथील शासकीय आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची अवस्था पाहिली असता सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला असून, याला जबाबदार कोण? असा सवाल जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळ कनयाळकर यांनी प्रशासनाला केला आहे. या उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असूनही या अत्यावश्यक बाबीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष का? निद्रावस्थेत असलेला आरोग्य विभाग आता तरी जागा होऊन या इमारतीच्या बाबतीत दुरुस्तीचा निर्णय घेईल काॽ असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लक्ष वेधून यात हलगर्जीपणा करून जनतेच्या जीवाशी खेळत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे श्री. कनयाळकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68020 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top