
सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा विज्ञान शाखा निकाल 100 टक्के
L२९२५३
- यथार्थ खवणेकर, भाग्यश्री मांजरेकर, मुरलीधर भगत, कृतिका चव्हाण, साक्षी चव्हाण, योगिता पेडणेकर.
सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा
विज्ञान शाखा निकाल १०० टक्के
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ ः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष विज्ञानचा शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या सहाव्या म्हणजेच, अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के तर, तृतीय वर्ष वाणिज्य विभागाचा निकाल ९६.३० टक्के लागला आहे. तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा निकाल असाः प्राणीशास्त्र विभाग-यथार्थ खवणेकर (९४ टक्के), रसायनशास्त्र विभाग-योगिता पेडणेकर (९१.०८ टक्के), भौतिकशास्त्र विभाग- भाग्यश्री मांजरेकर (८१.०८ टक्के). तृतीय वर्ष वाणिज्य विभाग- मुरलीधर भगत (८३ टक्के), कृतिका चव्हाण (७५ टक्के), साक्षी चव्हाण (७३.६६ टक्के). सहाव्या सत्रासाठी वाणिज्य विभागातून ८१, तर विज्ञान विभागातून १५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत आणि सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68023 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..