रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात अकरा न्यायाधीशांनी कार्यभार स्वीकारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात अकरा न्यायाधीशांनी कार्यभार स्वीकारला
टुडे

रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात अकरा न्यायाधीशांनी कार्यभार स्वीकारला

sakal_logo
By

नव्या न्यायाधीशांनी कार्यभार स्वीकारला

रत्नागिरी, ता. १५ ः रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या अकरा न्यायाधीशांनी कार्यभार स्वीकारला आहे. व्हेकेशन काळापूर्वी जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. सोमवारी (ता. १३) न्यायाधीश हजर झाले असून नियमित कामकाजाला सुरवात झाली आहे. नव्याने हजर झालेल्या न्यायाधीशांमध्ये आर. एच. सातव (वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश), ए. एन. कुलकर्णी (सचिव विधी सेवा प्राधिकरण), एम. आर. सातव (कनिष्ठ स्तरसह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ग्राम न्यायाधिकारी-रत्नागिरी), एस. एम वनकोरे (दुसरे कनिष्ठ स्तरसह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी-रत्नागिरी प्रेसिडींग ऑफिसर ज्युनिअर कोर्ट), ए. वाय. बोरकर (कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, दापोली), एस. एम. चव्हाण (दुसरे सहदिवाणी न्याधीश कनिष्ठस्तर, प्रथम न्यायदंडाधिकारी कनिष्ठस्तर-खेड), एस. पी. सदाफळे (दिवाणी न्यायाधीश कनिस्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर चिपळूण), बी. डी. तरे (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर-देवरुख), डी. एम. जी. मालिदवाले (असिस्टंट चॅरिटी कमिश्नर-रत्नागिरी) आदींचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68030 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top