शिलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिलक
शिलक

शिलक

sakal_logo
By

- ratchl142.jpg
L29140
ःचिपळूण ः दिल्ली येथे ग्लोबल टीचर ॲवॉर्ड स्वीकारताना संतोष जाधव.
....
ग्लोबल टीचर ॲवॉर्डने
संतोष जाधव सन्मानित
चिपळूण ः जिल्हा परिषद आदर्श शाळा धामणदिवी नं. १ चे शिक्षक संतोष जाधव यांना नुकताच दिल्लीमध्ये सावित्रीबाई फुले ग्लोबल टीचर ॲवॉर्डने इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये सन्मानित केले. हा सन्मान हरीश वीणा (एनसीईआरटी भारत सरकार), खेमसिंह डहेरिया (कुलपती हिंदी विश्वविद्यालय भोपाळ), लक्ष्मीचंद गोतम (अवर सचिव महिला बालविकास मंत्रालय भारत सरकार), बलवीर सिंग सिधू (जनरल रक्षा विभाग), गोपाल किरण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश निमराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. गोपाल किरण समाजसेवी संस्था भोपाळ मध्यप्रदेश या संस्थेद्वारा शैक्षणिक संमेलन दिल्ली येथे घेण्यात आले. संमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून संतोष जाधव यांना हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्याबद्दल जाधव यांचे शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, प्राचार्य डॉ. गजानन पाटील, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख बाबाजी शिर्के यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68046 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top