
राजापूर-पावसाच्या विश्रांतीने भातपेरणी धोक्यात
rat15p21.jpg
29278
ःराजापूर ः भात बियाणे पेरलेल्या शेत जमिनीला पावसाची प्रतीक्षा आहे.
-----------------------
पावसाची दडी; धोक्यात आली भातपेरणी
दिवसभर ऊन; नांगरणीसह उखळणीही आता रखडली
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः धडाकेबाज आगमनानंतर पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्याकडून देण्यात येणारे संकेतही फोल ठरताना दिसत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरीराजा चिंतातूर झाला आहे. दिवसभर कडक उन्हाच्या झळा आणि पावसाची एखादीही न पडणारी सर अशा स्थितीमध्ये बियाण्यांची पेरणी करायची की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.
यावर्षी पावसाने नेहमीप्रमाणे धडाक्यात सुरवात केली आहे. पावसाचा हा जोर पुढे कायम राहण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी तातडीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली. त्यामध्ये शेतनांगरणीसह बियाणे पेरणीला सुरवात केली. त्यातून शेतांमध्ये कामांची लगबग दिसू लागली आहे; मात्र, दमदार सुरवातीनंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दिवसभर पावसाची एकही सर पडत नाही. उलट दिवसभर कडक्याचे उन पडत आहे.
..
चौकट
परिस्थिती कायम राहिल्यास..
पावसाची दडी आणखीन काही दिवस अशीच राहिल्यास बियाण्यांची केलेली पेरणी पाण्याअभावी धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला आणखीन काही दिवसाची दडी कायम राहिल्यास भातबियाण्यांची पेरणी करायची की नाही? असा प्रश्न ठाकला आहे. त्याचवेळी पावसाअभावी नांगरणी आणि उखळणीची कामेही रखडली आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68065 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..