कणकवली : उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : उपोषण मागे
कणकवली : उपोषण मागे

कणकवली : उपोषण मागे

sakal_logo
By

29357
कणकवली : पुतळा स्थलांतरप्रश्नी उपोषणकर्त्यांनी लेखी पत्र देताना तहसीलदार आर.जे. पवार. शेजारी इतर.


छत्रपती शिवरायांचा पुतळा
स्थलांतरणासाठी प्रयत्नरत
तहसीलदार ः कणकवलीत भाजपचे उपोषण मागे

कणकवली, ता.१५ : शहरातील चौपदरीकरणात बाधित होत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरणासाठी भाजप कार्यकर्त्यांनी उपोषण सुरकरताच तहसीलदारांनी दखल घेतली. येथील पुतळा शासकीय जागेत स्थलांतर करण्यासाठीची शिफारस राज्‍याच्या अवर सचिवांकडे केल्याचे पत्र तहसीलदार आर.जे. पवार यांनी दिले. त्‍यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले.
आज सकाळपासून सुरू असलेल्‍या या उपोषणावेळी आमदार नीतेश राणे यांनीही उपस्थित राहून भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तर उपोषणाला शिवसेनेचे कलमठ ग्रामपंचायत सदस्य विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी देखील उपस्थित राहून पाठिंबा दिला. चौपदरीकरणात शहरातील छत्रपतींचा पुतळा बाधित होत आहे. हा पुतळा शासकीय जागेत स्थलांतर करण्याची ग्‍वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी सहा महिन्यापूर्वी दिली होती; मात्र पुतळा स्थलांतराबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्‍याने आजपासून भाजप कार्यकर्त्यानी शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या नेतृत्‍वाखाली उपोषण सुरू केले होते. हे उपोषण तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर आज मागे घेण्यात आले. या उपोषणात भाजपच्या महिला शहराध्यक्षा प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, पप्पू पुजारे, शिवसुंदर देसाई, अभय घाडीगावकर, संदीप सावंत, राजू हिर्लेकर, राजन चिके, महेश सावंत, अभिजीत मुसळे, बंडू गांगण, संजय ठाकूर, भाई आंबेलकर, शिशीर परुळेकर, सिद्धेश वालावलकर, संदीप मेस्त्री, बाळा पाटील, आनंद पारकर, स्वप्नील चिदरकर, राजू गवाणकर, महेश नार्वेकर, राजा पाटकर, राजू पेडणेकर, सोनू भंडारी, गणेश तळगावकर, नऊ झेमने, भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती मनोज रावराणे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68087 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top