चिपळूण ः शहरातील एकेरी मार्ग बनले दुहेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः शहरातील एकेरी मार्ग बनले दुहेरी
चिपळूण ः शहरातील एकेरी मार्ग बनले दुहेरी

चिपळूण ः शहरातील एकेरी मार्ग बनले दुहेरी

sakal_logo
By

-rat15p29.jpg
29309
ः चिपळूण ः पानगल्लीच्या समोरून मटण मार्केटकडे जाणाऱ्या‍ अरुंद आणि एकेरी मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते.
--------------
चिपळूण शहरातील एकेरी मार्ग बनले दुहेरी!

नागरिकांसह पोलिसांना विसर; वाहतूक कोंडीत भर
चिपळूण, ता. १५ ः शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी सुरू केलेले एकेरी मार्ग सध्या दुहेरी बनले आहेत. वाहनांची संख्या वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. एकेरी मार्गाचा नागरिकांसह वाहतूक पोलिसांनाही विसर पडला आहे.
एकेरी मार्गावरील वाहतूक कोंडी आणि कर्णकर्कश आवाजापासून सुटका होण्यासाठी आता वाहतूक पोलिस आणि पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील अनेक रस्ते एकेरी आहेत; मात्र ते एकेरी होते, असे सांगावे लागते. कारण एकेरी मार्गाचे चिन्ह दाखवणारे फलक गंजले आहेत. काही ठिकाणी फलक मोडकळीस आले आहेत. अनेक ठिकाणी तर फलकच नाहीत. एकेरी मार्गावर सध्या क्वचितच वाहतूक पोलिस दिसतात. एकेरी मार्ग दुहेरी बनल्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. एकेरी मार्गावरील दुकानासमोर पार्किंगमध्ये दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद होत आहे. सोमवारी बाजारपेठ बंद असते. त्यामुळे सोमवारचा दिवस वगळता उर्वरित दिवशी एकेरी मार्गावर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्यामुळे काही एकेरी आहेत. एकेरी मार्गावर दोन्ही बाजूने गाड्या आल्या तर वाहतूक कोंडी होते. अवजड मालवाहतुकीचे ट्रक आणि टेम्पो या मार्गावर उभे राहिले तरीही वाहतूक कोंडीत भर पडते.
-------------
चौकट
शहरातील एकेरी मार्ग असेः
पद्माचित्र मंदिर येथून गुहागर बायपासकडे जाणारा मार्ग
पानगल्ली येथून मटन मार्केटकडे जाणारा मार्ग
मटणमार्केट येथून अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकूलकडे जाणारा मार्ग
देसाई मुल्ला येथून वडनाकाकडे जाणारा मार्ग
नाईक कंपनी येथून जयंत साडी सेंटरकडे जाणारा मार्ग
बाजारपूल येथून भेंडीनाकाकडे जाणारा मार्ग
उक्ताडचौक येथून मच्छी मार्केटकडे जाणारा मार्ग
-------
काय करायला हवे...
एकेरी मार्गाचे फलक ठळकपणे लावावेत
एकेरी मार्ग सुरू होणाऱ्या ठिकाणी पोलिस तैनात असावा
रस्त्यावरील पार्किंगची तत्काळ कारवाई व्हावी
दंडात्मक कारवाई केल्यास नियम पाळले जातील

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68140 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top